RCB चा स्टार प्लेयर भारतीय मुली सोबत लग्नाच्या बेड्यात अडकल्या नंतर आता Join केली RCB ..?

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमनशी लग्न केले आहे. यामुळेच तो आयपीएलच्या सुरुवातीपासून आरसीबीमध्ये सामील होऊ शकला नाही. आरसीबी फ्रँचायझीने ट्विट करून मॅक्सवेलचा फोटो शेअर केला आणि मॅक्सवेल संघात सामील झाल्याचे कॅप्शन द्वारे सांगितले. पोस्टम ध्ये असेही लिहिले – हे त्या लोकांचे उत्तर आहे ज्यांनी लाखो कमेंट्स आणि ट्विट पोस्ट करून प्रश्न विचारला होता कि , मॅक्सवेल कधी येणार आहे ? आम्हाला खूप ख़ुशी मिळत आहे या क्षणाची.

View this post on Instagram

A post shared by VINI (@vini.raman)

मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनीशी लग्न केले: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने २७ मार्च भारतीय वंशाच्या विनी रमनशी तमिळ रितीरिवाजां नुसार लग्न केले. दोघांनी आधीच लग्न केले असले तरी यावेळी तामिळ रितीरिवाजा नुसार. यामुळेच मॅक्सवेल आयपीएल च्या सुरुवातीपासूनच संघात सहभागी होऊ शकला नाही. आरसीबी फ्रँचायझीने चालू हंगामात मॅक्सवेलला ११ कोटी रुपयांसह कायम ठेवले आहे.

मॅक्सवेल तिसरा सामनाही खेळू शकणार नाही: आरसीबीने आयपीएल २०२२ हंगामात दोन सामने खेळले, त्यापैकी एक जिंकला. २०५ धावा करूनही संघ पंजाब किंग्जविरुद्ध पहिला सामना ५ विकेटने हरला. यानंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा ३ गडी राखून पराभव केला. आता आरसीबीचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५ एप्रिलला होणार आहे, मात्र मॅक्सवेल क्वारंटाईनमुळे हा सामना खेळू शकणार नाही. अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

फ्रँचायझीने सांगितले की मॅक्सवेल चौथ्या सामन्यात उपलब्ध असेल. चालू मोसमात आरसीबीचा चौथा सामना पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना ९ एप्रिल रोजी पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मॅक्सवेल २०१७ पासून विनी रमनला डे’ट करत होता: ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल २०१७ पासून विनीला डे’ट करत होता. मेलबर्न मध्ये राहणारी विनी रमन ही व्यवसायाने फार्मासिस्ट असून ती तामिळ कुटुंबातील आहे. त्यामुळेच तमिळ परंपरेने हे लग्न पार पडले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाचे तामिळ भाषेतील व्हिजिटिंग कार्डही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप