आरसीबीने केला मोठा खुलासा सांगितले की, कशी आखली होती फाफ डू प्लेसिसला मिळवण्याची योजना!

आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने महान फलंदाज फाफ डू प्लेसिसला विकत घेण्यासाठी त्यांची लिलावाची रणनीती उघड केली आहे. आरसीबीने लिलावादरम्यान डु प्लेसिसला कसे खरेदी केले हे सांगितले.

आयपीएलच्या मेगा लिलावादरम्यान डु प्लेसिसला विकत घेण्यासाठी आरसीबी, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये बोली युद्ध सुरू होते, पण शेवटी, आरसीबीने ७ कोटींची बोली लावून डू प्लेसिसला आपल्या संघात समाविष्ट केले. डू प्लेसिस पुढील हंगामात आरसीबीचे कर्णधारपदही भूषवू शकतो. एबी डिव्हिलियर्सच्या बाहेर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा आणखी एक खेळाडू संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसेल.

आरसीबीचे क्रिकेट संचालन संचालक माईक हेसन यांनी फाफ डू प्लेसिसवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “आमच्या संघात आमच्याकडे असलेल्या पर्यायांबद्दल थोडी अनिश्चितता होती. त्यामुळे आम्हाला वाटले की आमच्याकडे फाफ डू प्लेसिससारखा अनुभवी खेळाडू असेल तर खूप फायदा होईल. तो बराच काळ दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार राहिला आहे. याशिवाय, त्याने अनेक वेळा आयपीएल जिंकले आहे आणि तो चांगली कामगिरी करत आहे.

आम्हाला माहित होते की CSK निश्चितपणे फाफ डु प्लेसिससाठी मोठी बोली लावेल
हेसन पुढे म्हणाले, “चेन्नई सुपर किंग्ज संघ त्यांच्यासाठी निश्चितपणे बोली लावेल हे निश्चित होते , कारण त्यांनी त्यांच्या सर्व जुन्या खेळाडूंसाठी जास्त बोली  लावली होती. तसेच डु प्लेसिस सुद्धा या खेळाडूंच्या यादीत होता. आम्हाला त्याच्यासाठी बजेट वाचवण्याची गरज होती.”

फाफ डु प्लेसिस हा एक दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आहे जो गेल्या काही वर्षांमध्ये बॉल टॅम्परिंगच्या विविध वादांमध्ये अडकला आहे आणि तरीही कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याच्या यशस्वी कार्यकाळामुळे क्रिकेट जगतात चांगले नाव कमावले आहे. त्याने आपल्या वनडे पदार्पणात भारताविरुद्ध नाबाद ६० धावा केल्या होत्या. सलग ९९ सामन्यात शून्यावर न आऊट होण्याचा विक्रम केला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी पदार्पणातच सामना जिंकणारे शतक झळकावले होते. आता आपल्याला तो आरसीबी सारख्या बलाढ्य टीम कडून खेळताना पाहायला मिळणार आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप