ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार असलेल्या रिकी पाँटिंगने रोहित शर्माला भारताचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. विराट कोहलीनंतर रोहित हा एकमेव असा व्यक्ती आहे जो संघाचे उत्तम नेतृत्व करू शकतो. तसेच रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्यामागील कथा पॉन्टिंगने उघड केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रिकी पाँटिंगने भारताचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार रोहित शर्माला विराट कोहलीनंतरचा पुढील कसोटी कर्णधार होण्याचे समर्थन केले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रोहितने मुंबई इंडियन्ससोबत मिळवलेले यश हे त्याच्या कर्णधारपदाचा दाखला असल्याचे तो म्हणाला. नोव्हेंबर २०२१ मध्ये टी-२० कर्णधार झाल्यानंतर शर्माला डिसेंबरमध्ये एकदिवसीय कर्णधारपद देण्यात आले. एप्रिलमध्ये होणाऱ्या आयपीएलमधील गेल्या मोसमातील खराब कामगिरी विसरून रोहित शर्मा यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे.
मुंबई इंडियन्सचे माजी कर्णधार असलेल्या रिकी पाँटिंगने पहिल्यांदाच रोहित शर्माला कर्णधार बनवण्यामागची भूमिका सांगितली आहे. त्याच्या सांगण्यावरूनच संघ व्यवस्थापनाने मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची नियुक्ती केल्याचे पाँटिंगचे म्हणणे आहे. पाँटिंग सध्या दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे नेतृत्व करून विक्रमी पाच वेळा IPL विजेतेपद (IPL २०२२ लिलाव) जिंकले आहे.
“जेव्हा मी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला तेव्हा संघ व्यवस्थापनाने माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला विचारले की पुढे फ्रँचायझीचा कर्णधार कोण व्हावे. मी याबद्दल अगदी स्पष्ट होतो. संघाला पुढे नेणारा एकच मुलगा होता आणि तो म्हणजे रोहित शर्मा. संघात असताना रोहितने ज्या प्रकारे मेहनत घेतली ते मी पाहिलेआहे असे हि पॉन्टिंग म्हणाला.
पुढे रिकी पॉन्टिंग म्हणाला ‘मला वाटते की त्याने मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट कर्णधारपद केले आहे. ते तेथील एक अतिशय यशस्वी नेते आहेत आणि त्यांनी काही प्रसंगी भारताचे नेतृत्वही केले आहे. गेल्या२-३ वर्षात त्याने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये काय केले यावर तर्क करणे कठीण आहे. त्या काळात त्याने जगभरात धावा केल्या आहेत आणि पांढर्या चेंडूचा खेळाडू म्हणून तो किती चांगला आहे हे आपल्याला माहीत आहे.
रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी बनसोड, नागपूर येथे झाला. रोहित शर्माच्या आईचे नाव पूर्णिमा शर्मा असून ती विशाखापट्टणमची आहे. रोहित शर्माच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा आहे. रोहित शर्माचे वडील देखील एक क्रिकेटर होते जे त्यांच्या फर्मसाठी क्रिकेट खेळायचे. रोहित शर्माचे बालपण खूप कठीण गेले. रोहित शर्माला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती.