रिकी पाँटिंगने सांगितली ३ सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांची नावे..!

आधुनिक क्रिकेट मध्ये फिटनेसचे महत्त्व खूप वाढले आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सध्याचा प्रत्येक खेळाडू जिम मध्ये तासनतास घाम गाळतो आणि योगा सनेही करतो. खेळाडूंच्या उत्तम फिटनेसचाच हा परिणाम आहे की, आता खेळाडू मैदानात आपले १०० टक्के देताना दिसतात. सध्याच्या घडीला फिटेस्ट क्रिकेटरचा विचार केला तर सध्या सगळ्यांच्या जिभे वर फक्त भारतीय कर्णधार विराट कोहलीचेच नाव येते. परंतु क्रिकेट च्या इतिहासात या पूर्वी ही अनेक तंदुरुस्त आणि तल्लख क्षेत्ररक्षक झाले आहेत.

रिकी पाँटिंग ने सायमंड्स, डिव्हिलियर्स आणि जॉन्टी रोड्सला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून सांगितले आहे. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी आपल्या काळातील ३ सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांची निवड केली आहे. एका चाहत्याने त्याला सोशल मीडिया वर विचारले होते की, तुझ्या दृष्टीने ३ सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण आहेत?

त्याला प्रत्युत्तर देताना रिकी पाँटिंग म्हणाला, त्याने आपला माजी सहकारी अँड्र्यू सायमंड्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स आणि जॉन्टी रोड्स चे नाव घेतले आहे. या तिघांचे त्याने आपल्या काळातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असे वर्णन केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हे तिन्ही क्षेत्ररक्षक मैदानावर खूप चपळ होते आणि त्यांनी त्यांच्या क्रिकेट करिअर मध्ये अनेक शानदार झेलही घेतले आहेत.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप