LIVE मुलाखतीत रिकी पाँटिंग रडू लागला होता, ३० सेकंद पर्यंत त्याचे अश्रू त्याला अनावरीत झाले नाहीत..! कारण होते शेन वॉर्न

क्रिकेट विश्वात अनेक खेळाडू आहेत जे त्यांच्या वेग- वेगळ्या शैली साठी ओळखले जातात. त्या पैकी एक शेन वॉर्न देखील होता, जो जगातील महान फिरकी पटू पैकी एक होता. ज्याने नुकताच अचानक जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. त्याच्या मृत्यू ची बातमी समजताच क्रिकेट विश्वात दुःखाची लाट पसरली होती.

या बातमी ने केवळ क्रिकेट दिग्गजच नाही तर शेन वॉर्नचे चाहते ही दु:खी झाले आहेत. शेन वॉर्न आपल्या सर्वामध्ये नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. शेन वॉर्न च्या सर्वात जवळ च्या मित्रा बद्दल बोलायचे तर तो होता रिकी पाँटिंग.  नुकत्याच एका थेट मुलाखती दरम्यान, शेन वॉर्नची आठवण करून रिकी रडू लागला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ricky Ponting AO (@rickyponting)

शेन वॉर्नचे हृदयविकारा च्या झटक्याने नि’धन झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून ही बातमी सर्वान समोर आली तेव्हा जगभरात एक वेगळीच शांतता पसरली होती. पाँटिंगला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्या संवेदना अनावरीत झाल्या होत्या. रिकीला अजून ही विश्वास बसत नाही की त्याचा जुना जिवलग मित्र आता आपल्यात राहिलेला नाही. या मुलाखतीत रिकी पाँटिंग शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहत होता. पण यादरम्यान तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याचे अश्रू वाहू लागला होता. यादरम्यान रिकी जवळपास २० सेकंद रडत होता. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया वर खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि जो कोणी हा व्हिडिओ पाहतो तो खूप भावूक होतो. आता जगभरातील चाहते शेन वॉर्नला सोशल मीडिया वर श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

या मुलाखतीत रिकी पॉन्टिंग ने सांगितले की, इतर जगा प्रमाणे मला ही हे जाणून आश्चर्य वाटले होते. सकाळी उठल्या वर मला सर्व काही समजले. मला माझ्या मुलींना नेट बॉल साठी सकाळी घेऊन जायचे आहे या विचाराने मी काल रात्री झोपलो होतो. पण सकाळी उठल्या वर सगळंच बदललं. ही बातमी स्वीकारायला मला खूप वेळ लागला होता. शेन वॉर्न हा माझ्या साठी माझ्या आयुष्याचा एक अनोखा भाग होता. त्याने क्रिकेट मध्ये फिरकी गोलंदाजीची ओळख वेगळ्या पद्धतीने करून दिली होती.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप