ऋषभ पंतने रोहितला विचारले गोलंदाजाला धक्का मारू का, रोहित म्हणाला मार दे..!

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज बर्मिंगहम मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग ११ मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी पुनरागमन केले आहे.

या सामन्यात चाहत्यांना सर्वाधिक आश्चर्य वाटले जेव्हा ऋषभ पंत कर्णधार रोहित शर्मा सोबत सलामीला उतरला. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि ४९ धावांची आक्रमक सुरुवात करून दिली होती. रोहित शर्माने ३१ आणि पंतने २६ धावांची धमाकेदार खेळी केली होती.

यादरम्यान, सामन्याच्या सुरुवातीच्या षटकात अशी काही घटना घडली जी आता चाहत्या मध्ये चर्चेचा आणि चेष्टेचा विषय बनली आहे. पहिल्याच षटकात डेव्हिड विलीला ऋषभ पंतने सिंगल धाव घेतली, त्याचवेळी डेव्हिड विली पंत समोर धावत आला. यादरम्यान पंतने कर्णधार रोहितकडे त्याची तक्रार केली.

ऋषभ पंतने रोहित शर्माला सांगितले की, धाव घेताना समोर येत आहे. मी धक्का मारू का. असे पंतने विचारल्या वर रोहित शर्माने गमतीने मार दे असे म्हणाला. यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. सुरुवातीची विकेट गमावल्या नंतर भारत एकापाठोपाठ एक विकेट गमावत राहिला होता. विराट कोहली काही विशेष करू शकला नाही आणि त्याला केवळ एक धाव करता आली. मात्र रवींद्र जडेजा च्या महत्त्व पूर्ण खेळी मुळे भारताने २० षटकांत ८ गडी गमावून १७० धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजीत ही भारत चांगली कामगिरी करत आहे.

१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १७ षटकात १२१ धावांवर आटोपला होता. भारताने दुसऱ्या T-२० मध्ये इंग्लंडचा ४९ धावांनी पराभव केला आहे. यासह भारताने तीन सामन्यांची टी-२० मालिका जिंकली आहे. इंग्लंड कडून मोईन अलीने सर्वाधिक ३५ आणि डेव्हिड विलीने नाबाद ३३ धावा केल्या आहेत. भारता कडून भुवनेश्वर कुमारने तीन बळी घेतले आहेत. तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप