भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना अहमदाबाद येथे खेळवला गेला होता. यामध्ये वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक मनोरंजक बदल केला होता. त्याने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला सलामीची संधी दिली होती. गेल्या सामन्यात पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. रेकॉर्ड बघितले तर पंत ओपनिंगच्या वेळी चांगली फलंदाजी करतो.
एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात केएल राहुलचे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले होते. गेल्या सामन्यात रोहित सोबत ईशान किशन सलामीला आला होता. मात्र राहुल परतल्या नंतर त्याला बाहेरच बसावे लागणार आहे. दुसऱ्या वनडेत रोहित आणि ऋषभ पंत ही जोडी सलामीसाठी मैदानात उतरली होती. पंतचे अंडर-१९ चे रेकॉर्ड बघितले तर तो ओपनिंग मध्ये खूप प्रभावी ठरला आहे.
ऋषभ पंतने अंडर-१९ संघात सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. या कालावधीत त्याने ११ सामन्यांत ४५४ धावा केल्या आहेत. यासोबतच पंतने एक शतक आणि ४ अर्धशतकेही केली आहेत. सलामीच्या वेळी त्याचा स्ट्राइक रेट ११०.४६ होता. त्यामुळे यापुढेही टीम इंडियाने त्याला ओपनिंगसाठी संधी दिली तर तो चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन कोरोना संसर्गामुळे मालिकेतील पहिले दोन सामने खेळू शकला नाही. इशान किशनने पहिल्या सामन्यात सलामी दिली होती. ईशानला फारशी छाप पाडता आली न्हवती. पंतला ओपनिंगमध्ये खेळवण्याचा प्रयोग पहिल्याच प्रयत्नात कामी आला नसला तरी त्याची खूप प्रशंसा झाली होती, कारण शिखर धवनच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या टॉप ३ फलंदाजांवर आक्रमक फलंदाज नसल्या बद्दल सातत्याने टीका होत होती. त्याचबरोबर राहुललाही मधल्या फळीत स्थिरावण्याची संधी मिळली होती. राहुलनेही आपली क्षमता दाखवत ४९ धावांची दमदार इनिंग खेळली, ज्यामुळे भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर पडता आले.
तुम्हाला सांगतो की, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ६० धावा केल्या होत्या. फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगली गोलंदाजी केली होती. या मालिकेतील तीन सामन्या नंतर दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकाही खेळवली जाणार आहे.