ऋषभ पंत धोनी सारखा चांगला विकेट कीपर बनत आहे, या पूर्व खळाडुने केले विधान..!

भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकरने ऋषभ पंतचे कौतुक केले असून त्याने फलंदाजी सोबतच यष्टिरक्षक म्हणून ही खूप चांगली कामगिरी केली असल्याचे म्हटले आहे. मांजरेकरचा विश्वास आहे की २४ वर्षीय खेळाडू केवळ विकेटच्या मागे बोलला नाही तर त्याने जबाबदारीने आपले काम पार पाडले आहे.

मांजरेकर पंत च्या फलंदाजी बद्दल म्हणाला की, पंतची फलंदाजी प्रभावी आहे यात शंका नाही, पंतने स्वत:ला सिद्ध केले आहे की तो काय करू शकतो. इंग्लंड च्या परिस्थितीत डावखुऱ्या फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला असला तरी त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

सोनी स्पोर्ट्सला विचारले असता फलंदाज पंतने प्रभावित केले आहे का, यावर मांजरेकर म्हणाला की, यात काही शंका नाही. त्याने एक महान खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पाच शतके पैकी ४ परदेशात येऊन करणे अविश्वसनीय आहे. पण मला फक्त त्याच्या किपिंग बद्दल बोलायचे आहे, कारण त्याच्या फलंदाजी बद्दल बरेच लोक बरेच काही बोलले आहेत.

मांजरेकरने प्रसार माध्यमांना सांगितले की, पंतने फलंदाजी सोबतच यष्टिरक्षकाची जबाबदारी कशी स्वीकारली हे मला आवडते. त्यांना पंतसारखा यष्टिरक्षक मिळणार आहे ही भारता साठी मोठी बातमी आहे. तुम्ही त्याला स्टंप जवळ फारसे बोलताना पाहिले नसेल, तो धोनी प्रमाणेच त्याचे काम अतिशय गांभीर्याने करतो. मला आश्चर्य वाटते की एक फलंदाज म्हणून तुमच्या वर किती दबाव आहे, तरीही तो यष्टिरक्षणाकडे इतकं लक्ष देतो आणि स्वत:ला सुधारण्या साठी खूप मेहनत घेतो.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना १ जुलै रोजी सुरू झाला आणि ५ जुलै रोजी इंग्लंडने ७ विकेट्सने सामना जिंकला. पहिल्या दिवशी जेम्स अँडरसनने भारताच्या आघाडीच्या फलंदाजीला नमवले. पण ऋषभ पंत च्या आगमना नंतर इंग्लंड च्या गोलंदाजांची अवस्था बिकट झाली. जडेजा एकीकडे शेवट सांभाळत होता, तर दुसरी कडे पंत गोलंदाजांना रडवत होता. या झटपट खेळी मुळे पंतचे जगभरातून आणि क्रिकेटच्या दिग्गजां कडून कौतुक होत आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप