ऋषभ पंतच्या कर्णधारपदावर प्रश्न चिन्ह उपस्थित, या निर्णयावर दिग्गज खेळाडू संतापले..!

दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला चार गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडिया ने दणदणीत विजय मिळाला होता. आता टीम इंडिया मालिकेत १-२ ने पिछाडी वर आहे. पहिल्या दोन सामन्यात सलग दोन पराभवा नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाची कमान सांभाळणाऱ्या ऋषभ पंत च्या निर्णयां वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिनेश कार्तिक पूर्वी अक्षर पटेलला फलंदाजी साठी पाठवण्या च्या पंत च्या निर्णया वर दिग्गज खेळाडूंनी टीका केली आहे.

१३ व्या षटकातच ऋषभ पंत ने अक्षर पटेलला फलंदाजी साठी पाठवले होते. पण पंतची ही प्लँनिंग चालली नाही. अक्षर पटेल अवघ्या ९ धावा करून पटेल पॅव्हेलियन मध्ये परतला होता. त्याच वेळी कार्तिक ने २१ चेंडूत नाबाद ३० धावांची चांगली खेळी खेळली होती.

भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यावर म्हणाला की, अक्षर पटेल च्या आधी दिनेश कार्तिकला फलंदाजी साठी पाठवायला हवे होते. तो म्हणाला, कधी कधी तुम्ही खेळाडूं वर फिनिशर असल्याचा टॅग लावता आणि १५ व्या षटका नंतरच तो फलंदाजीला येईल असे मानता. पण गरज भासल्यास अशा खेळाडूला लवकर फलंदाजी साठी पाठवावे. त्याच्या मते तो खेळ समजून घेऊन डाव पुढे नेऊ शकतो.

पंतचा हा निर्णय ग्रॅम स्मिथला ही समजला नाही. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार म्हणाला की, मला समजत नाही कार्तिक हा भारतातील सर्वात अनुभवी खेळाडूं पैकी एक आहे. तो भारता साठी किती सामने खेळला आहे? तुम्ही अक्षर पटेलला त्याच्या पुढे कसे पाठवू शकता.

गौतम गंभीर ने ही कार्तिकला आधी पाठवण्या च्या गोष्टी वर आपले मत मांडले आहे. गंभीर म्हणाला की, तुम्ही कार्तिकला फक्त शेवट च्या तीन षटकांसाठी ठेवू शकत नाही. जर तुमच्या कडे फलंदाज असतील तर त्याला फक्त ६ व्या क्रमांका वर पाठवा. कठीण परिस्थितीत तुम्हाला अधिक संधी असते.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप