रिलीज झाल्याच्या पुष्कळ दिवसांनंतरही कन्नड सुपरस्टार यशची प्रमुख भूमिका असलेल्या केजीएफ चाप्टर 2 या सिनेमाची अजूनही तुफान क्रेझ चित्रपट रसिकांमध्ये पाहायला मिळत आहे! प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमाने जगभरात तुफान कमाई केली आहे. आणि आता या चित्रपटाने आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या पीके या चित्रपटाचा विक्रम देखील मोडला आहे!!
View this post on Instagram
या चित्रपटासाठी यशने रविना टंडन, संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी यांच्यासोबत मिळून या सिनेमासाठी तुफान प्रमोशन केले आहे. सुरुवातीलाच प्रदर्शित करण्यात आलेल्या याच्या ट्रेलर मधील तडफदार डायलॉग ऐकून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल तुफान उत्सुकता वाढली होती!
सिनेसृष्टी मधील चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालम यांनी याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे. आतापर्यंत केजीएफ 2 ने जगभरात 883.56 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे! या चित्रपटाने आमिर खानच्या पिके या चित्रपटाचे लाईफ टाईम कलेक्शन देखील पार केले आहे!!
जगभरात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आता केजीएफ 2 या सिनेमाचा देखील समावेश झालेला आहे. या यादीमध्ये केजीएफ 2 ने सहाव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे!! तर पिके हा चित्रपट आता सातव्या नंबर वर गेला आहे. या यादीत दंगल, बाहुबली टू, आरआरआर, बजरंगी भाईजान आणि सीक्रेट सुपरस्टार हे ही सिनेमे आहेत. असे असले तरी अजूनही थिएटरमध्ये या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे!
View this post on Instagram
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या पिके या चित्रपटाने जगभरात 854 कोटी रुपयांची कमाई करण्यात यश मिळवले होते. मात्र केजीएफ 2 ने हाच आकडा पार करत जगभरात सर्वाधिक कमाई करणार्या चित्रपटांच्या यादीत सहावे स्थान पटकावले आहे!! तर आता सिनेसृष्टीत अशी चर्चा रंगली आहे की, हा सिनेमा आमिर खानच्या दंगल सिनेमाही लवकरच मागे टाकणार आहे! केजीएफ 2 च्या हिंदी वर्जन भारतात आतापर्यंत 329.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
केजीएफ 2 हा सिनेमा केजीएफ या सिनेमाचा सिक्वेल आहे. केजीएफ भाग 1 देखील तुफान चालला होता. आता केजीएफ 2 मध्ये यश सह रविना टंडन, संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज यांसारख्या दिग्गज कलाकारांची वर्णी लागली आहे.