रोहितला सापडला बुमरा सारखा खतरनाक गोलंदाज, आतामुंबई इंडियन्सचे मोठे टेन्शन संपले..!

टीम इंडिया चा घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्याच्या काळातील सर्वात घातक गोलंदाजा पैकी एक आहे. बुमराह ने टीम इंडिया साठी अनेक सामने स्वबळावर जिंकवले आहेत. मोहम्मद शमी सोबत बुमराह ची कामगिरी अप्रतिम आहे. पण कर्णधार रोहित शर्माला आता एक मजबूत गोलंदाज मिळाला आहे जो आगामी काळात बुमराह आणि शमीची कमतरता भरून काढू शकतो. या खेळाडूला वेस्ट इंडिज विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती.

रोहित शर्माच्या संघात एका घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. तिसऱ्या T-२० मध्ये रोहित शर्माने एका नव्या गोलंदाजाला संधी दिली होती. आवेश खान असे या गोलंदाजाचे नाव आहे. आयपीएल २०२१ मधील त्याच्या अप्रतिम कामगिरीचे फळ अखेर आवेशला मिळाले आहे. आवेश गेल्या मोसमात पर्पल कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. त्याने १६ सामन्यात एकूण २४ विकेट घेतल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Avesh Khan (@aavi.khan)

आवेश अतिशय धोकादायक गोलंदाजी करतो, याचा नमुना आपण आयपीएल मध्ये पाहिला आहे. त्याने एकट्याने दिल्ली कॅपिटल्स संघाला आयपीएल २०२१ च्या प्लेऑफ मध्ये स्वबळावर नेले होते. सामन्यात विकेट घेण्याची त्याची कला सर्वांनाच माहित आहे. आवेश खान आयपीएल मध्ये एक यशस्वी गोलंदाज ठरला होता. जेव्हा तो त्याच्या लय मध्ये असतो तेव्हा तो कोणत्याही फलंदाजाची विकेट घेऊ शकतो. आयपीएल २०२१ मध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता.

View this post on Instagram

A post shared by Avesh Khan (@aavi.khan)

दिल्ली कॅपिटल्स चा माजी वेगवान गोलंदाज आवेश खान वर आयपीएल लिलावात पहिल्याच दिवशी मोठी बोली लागली होती. २०२१ च्या आयपीएल मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज आवेश खान याला लखनौ सुपर जायंट्सने १० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. आवेशची मूळ किंमत २० लाख रुपये होती. अशा प्रकारे आवेश खानला ५० पट जास्त किंमत मिळाली आहे. १४ एप्रिल २०१७ रोजी, आवेश खानने इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर साठी आयपीएल पदार्पण केले होते.

या सामन्यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (क), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई आणि आवेश खान हा भारतीय संघ खेळला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप