रोहितला मिळाला हार्दिक पांड्याचा जब्बरदस्त Replacement , त्याच्या नेतृत्वाखाली याला मिळू शकते संधी..!

विजय हजारे ट्रॉफीच्या चालू हंगामात व्यंकटेश अय्यरने आतापर्यंत २ शतके झळकावली आहेत. अय्यरने या काळात काही विकेट्सही घेतल्या आहेत, ज्यामुळे तो संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याला मागे सोडण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे. टीम इंडियाला नवीन हार्दिक पांड्या मिळाला आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत वेंकटेश अय्यरला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळवणे कठीण आहे. अशा स्थितीत पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला फिनिशरची भूमिका पार पाडावी लागणार आहे.

वेंकटेश अय्यरने केरळ विरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ८४ चेंडूत ११२ धावा आणि त्यानंतर ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४९ चेंडूत ७१ धावा करून केरळविरुद्ध अशीच भूमिका बजावली होती. ही मालिका पुढे नेत त्याने ११३ चेंडूत १० षटकारांच्या मदतीने १५१ धावा केल्या होत्या, त्यामुळे वेंकटेशची दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी निश्चितपणे निवड होऊ शकते. तो प्रत्येक सामन्यात ९ किंवा १० ओव्हर गोलंदाजी करत आहे आणि हार्दिक पांड्या अनफिट असल्याने त्याला संधी देण्याची ही योग्य वेळ आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, नव्या संघ व्यवस्थापनाने त्याला मधल्या फळीत फलंदाजी करण्याचा सल्ला देऊन योग्य ते केले आहे.

व्यंकटेश अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-२० पदार्पण केले आहे. एक क्रिकेटपटू म्हणून, वेंकटेश्वर आपल्या संघासाठी बॅट आणि गोलंदाज या दोन्ही मध्ये योगदान देऊ शकतो. व्यंकटेश अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अवघ्या १४६ चेंडूत १९८ धावांची धमाकेदार खेळी केली होती. या खेळीत त्याने २० चौकार आणि ७ षटकारही मारले होते.

प्रथम श्रेणी सामन्यांबद्दल बोलायचे तर, वेंकटेशने ६ ऑगस्ट २०१८ रोजी हैदराबाद संघाविरुद्ध पदार्पण केले होते. या सामन्यात तो मध्य प्रदेशकडून खेळत होता पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली न्हवती. २०१५ मध्ये त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रेल्वे संघाविरुद्धच्या या सामन्यातही त्याला खेळण्याची संधी मिळाली न्हवती.

आयपीएल बद्दल बोलायचे झाले तर व्यंकटेश अय्यरला आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात तो कोलकाता नाईट रायडर्सकडून मैदानात उतरला होता. पदार्पणाच्या पहिल्याच डावात व्यंकटेशने २७ चेंडूत ४१ धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि १ षटकारही मारला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप