रोहितने आवेश खानला पाठीशी घालत आपल्या चुकीच्या निर्णयावर केली सारवा सारव, म्हणाला भुवीने शेवटचे षटक टाकले असते तर..!!

ओबेड मॅकॉयच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी दुसऱ्या टी-२० मध्ये चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १९.४ षटकांत १३८ धावांवर गारद झाला. यानंतर विंडीज संघाने १९.२ षटकात ५ बाद १४१ धावा केल्या आणि सामना ५ विकेटने जिंकला. या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने१ -१ अशी बरोबरी साधली.

शेवटच्या षटकात विंडीजला १० धावांची गरज होती. आवेश खानला ओव्हर देण्यात आली पहिलाच  चेंडू नो बॉल टाकून त्यावर षटकार ठोकन्यात आला, आणि वेस्टइंडीजने विजय मिळवला.  भुवनेश्वर कुमारची दोन षटके बाकी होती, पण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भुवनेश्वरऐवजी आवेश खानकडे चेंडू सोपवला, त्यानंतर आवेशच्या मोठ्या चुकीमुळे भारताचा पराभव झाला.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतर रोहित म्हणाला, ‘सर्वप्रथम आम्ही कमी धावा केल्या होत्या. आमची फलंदाजीही चांगली झाली नाही. खेळपट्टी चांगली होती, पण आम्ही स्वतः चांगली कामगिरी करू शकलो नाही. पण मी, तुम्ही नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही, आणि पुढे तो म्हणाला आम्ही या पराभवातून शिकू.

शेवटच्या षटकात आवेश खानच्या चुकीचा बचाव करत रोहित म्हणाला, “आम्हाला माहित आहे की भुवनेश्वरने आमच्यासाठी हे केले आहे आणि त्याने सामने वाचवले आहेत, परंतु जोपर्यंत तुम्ही अशी षटके आवेश किंवा अर्शदीपला देत नाही, तोपर्यंत तुम्हाला कसे कळणार?” कि ते गोलंदाज अश्या परीस्थित कशी गोलंदाजी करतायत? तो फक्त सामना होता. या सर्व गोलंदाजांमध्ये कौशल्य आणि प्रतिभा आहे, परंतु आम्हाला त्यांचा पाठींबा हवा आहे.”

सामना गमावल्यानंतरही रोहित शर्माने आपल्या गोलंदाजांचे जोरदार कौतुक केले. रोहित शर्मा म्हणाला, “माझ्या संघाचा आणि गोलंदाजांचा अभिमान आहे. अशा लक्ष्याचा पाठलाग१३ -१४ षटकांत करता येतो, पण आम्ही शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचून आणला. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने योजना अंमलात आणल्या त्यामुळे मी खूप खूश आहे. आम्हाला आमच्या फलंदाजीमध्ये काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल, परंतु मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की आम्हाला फलंदाजीबाबत असा दृष्टिकोन हवा आहे आणि आम्ही त्याबद्दल घाबरणार नाही. पराभवानंतर आम्ही काहीही बदलणार नाही.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप