रवींद्र जडेजाच्या द्विशतकापूर्वी डाव घोषित केल्याबद्दल रोहित शर्मा आणि राहुल द्रविड झाले ट्रो’ल, मजेशीर प्रतिक्रिया..!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहाली येथे सुरू आहे. हा सामना विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना आहे आणि सर्वांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. कोहलीला पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नसली तरी सर रवींद्र जडेजाचा मास्टर क्लास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. जडेजा पहिल्या दिवशी ४५ धावा करून नाबाद परतला पण आज त्याने शानदार फलंदाजी करत चौफेर फटके खेळले.

त्याने आधी शतक झळकावले आणि नंतर १५० धावांचा टप्पाही पूर्ण केला. तो ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून हा अष्टपैलू खेळाडू त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतकही झळकावेल, असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही आणि चहापानापूर्वी कर्णधार रोहित शर्माने ५७४/८ धावांवर डाव घोषित केला. त्यावेळी जडेजा २२८ चेंडूत १७५ धावांवर नाबाद होता. या निर्णयानंतर ट्विटरवर यूजर्सनी रोहित शर्मा तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ट्रो’ल केले.

ट्विटर वर आलेल्या काही मजेदार प्रतिक्रियांवर आपण एक नजर टाकू आणि या क्षणाची मज्जा घेऊ..

अशा प्रकारे रोहित शर्मा आणि राहुल द्रविड याना खूपच ट्रो’ल केलेला दिसून आले आहे खूपच मजदार पाने ट्रो’ल केलेले दिसत आहे आणि असेच तुमचे मनोरंजन करण्याचे आम्हाला संधी द्या आणि आमचा लेख कसा वाटला आम्हाला कंमेंट मध्ये कळवा..

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप