अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिज सोबत पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. जिथे नवीन कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फिरकीपटूंच्या शानदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा संघ १७६ धावांवरच रोखला गेला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 6 विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यात 10 मोठे विक्रम झाले आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सामन्यात 10 मोठे विक्रम, रोहित शर्माने रचले विक्रम
1. भारतीय संघाचा वनडे फॉरमॅटमधील हा १००० वा सामना आहे. अशी कामगिरी करणारा हा भारतीय संघ पहिला संघ ठरला आहे. या यादीत अनेक देश आहेत पण पहिल्या क्रमांकावर आहे.
View this post on Instagram
२. युझवेंद्र चहल ने या सामन्यात पहिली विकेट घेताच एकदिवसीय क्रिकेटमधील१०० वी विकेट पूर्ण केली आहे. या सामन्यानंतर त्याच्या विकेट्सची संख्या आता 103 झाली आहे. चहल हा उत्तम गोलंदाज आहे. त्याने आपियाल मध्ये बेंगुलुरू कडून खेळताना खूप चांगली कामगिरी केली आहे.
३. या दोन संघांमधील हा १३४ वा एकदिवसीय सामना होता. यातील ६५ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत, तर ६३ सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे.
४. सलग ४ सामन्यातील पराभवाचा सिलसिला आता भारतीय संघाने खंडित केला आहे. याआधी श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण आता वेस्ट इंडिज ला हरवून भारताने हा पराभवाचा सिलसिला खंडित केला आहे.
५. रोहित शर्माचा हा कर्णधार म्हणून पहिला एकदिवसीय सामना होता. याआधी त्याने काळजीवाहू कउपकर्णधार म्हणून १० एकदिवसीय सामने खेळले होते.रोहित आता चांगली कामगिरी करत आपल्या टीम ला यशाच्या शिखरावर जाण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.
६. जेसन होल्डरने आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या. जेसन होल्डर हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे त्याने आयपील मध्ये हि खूप चांगली कामगिरी केली आहे.
७. वेस्ट इंडिजसाठी एकदिवसीय क्रिकटमध्ये सर्वाधिक कमी धावांच्या बाबतीत किरॉन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तो १५ वेळा शून्यावर बाद झाला आहे, तर ख्रिस गेल २४ वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
८. जेसन होल्डर २००० धावा आणि १०० एकदिवसीय विकेट घेणारा वेस्ट इंडिजचा ५ वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी व्हिव्ह रिचर्ड्स, कार्ल हूपर, ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनी हा पराक्रम केला आहे.
रोहित शर्मा टीमसोबत
9. आज रोहित शर्मा ने एकदिवसीय क्रिकेटमधील ४४ वे अर्धशतक झळकावले आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे.
१०. आज विराट कोहली ने घरच्या मैदानावर ५ हजार ODI धावा पूर्ण केल्या आहेत. या प्रकरणात, तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे.