रोहित शर्माने रचला आणखी एक इतिहास सर्वाधिक धावा करणारा ठरला पहिला खेळाडू, मार्टिन गुप्टिललाही टाकले मागे..!!

रोहित शर्मा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना सुरू आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यामध्ये त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत १२९ टी-२० सामन्यात ३४४३ धावा केल्या आहेत. या दरम्यान, भारतीय कर्णधाराची सरासरी ३२.४८ आहे तर सर्वोत्तम धावसंख्या ११८ आहे. त्याचबरोबर या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ११६ टी-२०  सामन्यांमध्ये ३२.३७ च्या सरासरीने ३३९९ धावा केल्या आहेत, तर सर्वोच्च धावसंख्या १०५ धावा आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

या यादीत भारताचा दिग्गज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ९९ टी-२० सामन्यांमध्ये ३३०८ धावा केल्या आहेत. या दरम्यान, माजी भारतीय कर्णधाराची सरासरी ५०.१२ आहे आणि सर्वोत्तम धावसंख्या ९४ आहे. कालच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने ४४ चेंडूत ६४ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४४ चेंडूत ६४ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि दोन षटकार आले.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप