भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने टी-२० विश्वचषका पूर्वी संघा च्या आक्रमक वृत्ती वर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आपण ज्या प्रकारचा दृष्टि कोन घेऊन खेळत आहोत ते कधी ना कधी अपयशाला कारणीभूत ठरते, त्यामुळे फारसा गोंगाट होऊ नये आणि लोकांनी गप्प बसावे, असे त्याने म्हटले आहे.
खरे तर भारतीय संघा ने अलीकडेच इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध च्या टी-२० मालिकेत अतिशय आक्रमक वृत्ती स्वीकारली होती. संघाने जोरदार फलंदाजी केली होती. मात्र, यादरम्यान त्यांना एका सामन्यात पराभवाला ही सामोरे जावे लागले होते.
A dominant performance by our bowlers 👏👏#TeamIndia win the 1st #WIvIND T20I by 68 runs and take 1-0 series lead 💪 pic.twitter.com/H15eUfQZoK
— BCCI (@BCCI) July 29, 2022
रोहित शर्मा च्या म्हणण्या नुसार, जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे क्रिकेट खेळता तेव्हा तुम्ही कधी अपयशी व्हाल तर कधी यशस्वी व्हाल असे त्याला वाटते. पत्रकार विमल कुमार याच्या शी झालेल्या संवादात तो म्हणाला होता की, म्हणूनच मी वारंवार सांगतो की बाहेर च्या लोकांनी गप्प बसावे. आम्ही सध्या खेळत असलेला क्रिकेटचा ब्रँड अपयशी ठरेल आणि निकाल आमच्या बाजूने जाणार नाही. पण आमची काही हरकत नाही कारण आम्ही काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत, या काळात चुका होतील पण याचा अर्थ असा नाही की संघ किंवा खेळाडू वाईट आहेत.
INDIA’S T20 WORLD CUP SQUAD: KL KL Rahul, Rohit Sharma, Hardik Pandya, Rishab Pant, Ravindra Jadeja, Dinesh Karthik, Shardul Thakur, Bhuvaneshwar Kumar, Jaspreet Bumrah, ArshDeep, Y Chahal in that order, Bench: Deepak Chahar, Deepak Hooda, Shreyas Iyer & Axar Patel
— Spirit Suds (@SudsSpirit) July 30, 2022
२०२१ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली नव्हती. याचे कारण पॉवरप्ले मध्ये संघाला जास्त धावा करता आल्या नाहीत. या मुळेच त्याला न्यूझीलंड आणि पाकिस्तान सारख्या सर्वोत्तम संघा कडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र भारतीय संघ आता त्या उणीवा वर काम करत असून कर्णधार रोहित शर्मा ने या आक्रमक वृत्ती ने खेळण्याचे संकेत दिले आहेत.