रोहित शर्माने कर्णधारपदामध्ये रचला इतिहास, इतके मोठे काम धोनीला आजतागायत करता आले नाही..!

सध्या क्रिकेट मध्ये कोणताही संघ सर्वोत्तम कामगिरी करत असेल तर तो भारतीय संघ आहे. यावेळी भारतीय संघाचे वेगळेपण पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रिकेट विश्वात असा कोणताही संघ नाही, जो भारतीय संघाकडून पराभूत झालेला नाही. इतकंच नाही तर भारतीय संघाने परदेशी मैदानावर जाऊनही संघांना पराभूत केले आहे. पण तुम्हाला सांगू इच्छितो की विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानेही एवढी उंची गाठली होती. मात्र, विराटने गेल्या वर्षी टी-२० कर्णधारपद सोडले होते.

त्यानंतर बीसीसीआयने त्याला एकदिवसीय आणि कसोटी कर्णधारपदा वरून ही काढून टाकले होते. सध्या विराटचा भारतीय संघात केवळ साधा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, जेव्हा विराटने कर्णधारपद सोडले तेव्हा संपूर्ण जगाची निराशा झाली होती, कारण प्रत्येकजण विचार करत होता की, आता विराटसारखा आश्वासक कर्णधार कसा मिळणार? विराटने कर्णधारपद सोडल्यानंतरच रोहित शर्माला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले होते.

पण रोहितच्या कर्णधारपदाने अवघ्या जगाला आश्चर्याचा ध’क्का दिला आहे. रोहित कर्णधार बनताच त्याने ते केले जे एमएस धोनी देखील त्याच्या कर्णधारपदा खाली करू शकला नाही. जाणून घेऊया, रोहितने असे काय केले आहे, जे धोनीलाही करता आले नाही. रोहित शर्मा हा एक चांगला खेळाडू आहे हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. आता तो केवळ खेळाडूच नाही तर एक मजबूत कर्णधारही बनला आहे. याचे कारण म्हणजे आयपीएल मध्ये असताना, त्याने आपल्या टीम मुंबई इंडियन्सला आतापर्यंत सर्वाधिक आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली आहेत. तो आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारा पैकी एक आहे.

अशा प्रकारे धोनीही त्यांच्या मागे आहे. रोहित भारताचा कर्णधार झाल्यापासून आजपर्यंत भारताने एकही सामना गमावलेला नाही. हे अगदी खरे आहे की, रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार झाल्यापासून भारताने ३ टी-२० मालिका खेळल्या आहेत

तिन्ही मालिका ३-० ने जिंकल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र भारतीय संघाचीच चर्चा सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग १२ सामने जिंकले आहेत आणि धोनीच नाही तर जगातील कोणत्याही कर्णधाराला ही कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच आगामी काळात धोनीपेक्षाही रोहित शर्मा यशस्वी कर्णधार बनणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप