मुंबई इंडियन्स चा कर्णधार रोहित शर्माला बुधवारी (१३ एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध च्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ मधील रोहित ची ही दुसरी खेळी आहे जेव्हा रोहितला स्लो ओव्हर रेट साठी दंड ठोठावण्यात आला आहे आणि जर मुंबई इंडियन्स ने या मोसमात तिसऱ्यांदा चुकीची पुनरावृत्ती केली तर त्याला दंड भरावा लागेल आणि कर्णधार रोहित शर्माला एका सामन्या साठी बंदी लागू शकते.
कर्णधार रोहित सह उर्वरित संघाला ६ लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५ टक्के या पैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल च्या अधिकृत साईट ने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात याची पुष्टी करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स चा कर्णधार ऋषभ पंत आणि सनरायझर्स हैदराबाद चा कर्णधार केन विल्यमसन हे एकदा स्लो ओव्हर रेट साठी दोषी आढळले होते.
View this post on Instagram
आयपीएल ने जारी केलेल्या प्रेस रिलीझ मध्ये असे म्हटले आहे की, आयपीएल च्या आचारसंहिते अंतर्गत संघाचा हा सीझन मधील दुसरा गुन्हा आहे, जो किमान ओव्हर रेट गुन्ह्यांशी संबंधित होता. मुंबई इंडियन्स चा कर्णधार रोहित शर्माला २४ लाख रुपये आणि प्लेइंग इलेव्हन च्या उर्वरित खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५ टक्के या पैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, २७ मार्च रोजी, दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध च्या हंगामातील पहिल्या सामन्यात, MI कर्णधार रोहितला स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रोहित शर्माला आता चूक करण्याची संधी नाही. मुंबई इंडियन्स ला या मोसमात अजून ९ सामने खेळायचे आहेत, प्रत्येक सामन्यात त्यांना खेळा सोबतच घड्याळाकडे ही लक्ष द्यावे लागणार आहे.
आयपीएल २०२२ हा मुंबई इंडियन्स साठी आता पर्यंत चा प्रवास निराशा जनक राहिला आहे. या मोसमात ५ सामने खेळलेला एमआय अजून ही पहिल्या विजया साठी आसुसलेला आहे. त्यांनी PBKS विरुद्ध खूप चांगली कामगिरी केली, पण शेवटी १२ धावांनी सामना गमावला होता.