रोहित शर्मा T-20 कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो- वीरेंद्र सेहवागने भारतीय कर्णधाराला दिला धक्कादायक सल्ला..!

रोहित शर्माची गेल्या वर्षी तिन्ही फॉर मॅट मध्ये भारतीय संघाच्या कर्णधार पदी नियुक्ती करण्यात आली होती. आधी त्याला टी-२० आणि वनडेची कमान मिळाली होती. त्याचवेळी विराट कोहलीने कसोटी कर्णधार पद सोडले तेव्हा त्याला लाल चेंडूतही टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, आता भारताचा माजी सलामी वीर वीरेंद्र सेहवाग ने कर्णधार पदा बाबत रोहितला धक्कादायक सूचना दिली आहे. तो म्हणाला की, रोहित टी-२० फॉरमॅट मधील भारतीय संघाचे कर्णधार पद सोडण्याचा विचार करू शकतो.

गेल्या वर्षी पूर्ण वेळ कर्णधार झाल्या पासून, रोहित शर्मा विविध कारणां मुळे भारता साठी अनेक सामने मुकला आहे. कधी दुखापत झाली, कधी ब्रेक मुळे तो निवडी साठी उपलब्ध झाला न्हवता. सेहवागला असे वाटते की जर रोहित शर्माला नियमित विश्रांतीची आवश्यकता असेल तर तो टी-२० चे कर्णधार पद दुसऱ्याला देण्याचा विचार करू शकतो व इतर दोन फॉर मॅट मध्ये तो चांगली कामगिरी करू शकतो.

View this post on Instagram

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

सोनी नेटवर्क ने आयोजित केलेल्या संवादा दरम्यान सेहवाग म्हणाला की, जर भारतीय संघ व्यवस्थापना ने T-२० फॉर मॅट मध्ये कर्णधार म्हणून दुसरा कोणाचा विचार केला तर मला वाटते की रोहित शर्माला दिलासा मिळू शकतो आणि पुढे जाण्या साठी पुढील गोष्टींची काळजी घेतली जाऊ शकते. जे रोहितला त्याच्या वयाचा विचार करून त्याच्या कामाचा ताण आणि मानसिक थकवा कमी करण्यात मदत होऊ शकतो. T-२० मध्ये एखाद्या नवीन व्यक्तीची कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्या वर रोहितला विश्रांती घेता येईल आणि कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही सामन्यां मध्ये भारताचे नेतृत्व करण्या साठी त्याला ताजेतवाने वाटेल.

भारतीय क्रिकेट मध्ये वेगळे कर्णधार क्वचितच पाहायला मिळतात. बोर्डाला वेग- वेगळे कर्णधार नको असतील तर रोहित सध्या सर्व फॉर मॅट मध्ये नेतृत्व करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे असेही सेहवाग म्हणाला. भारतीय थिंक-टँकला अजून ही त्याच धोरणा ने पुढे जायचे असेल जे तीनही फॉर मॅट मध्ये एका माणसाने भारताचे नेतृत्व करावे, तर मला अजूनही विश्वास आहे की रोहित शर्मा त्या साठी सर्वोत्तम व्यक्ती आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप