रोहित शर्माला या कारणा मुळे कसोटी कर्णधार बनवण्यात आले होते, चेतन शर्माने सांगितले कारण..!

जेव्हा टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची वनडेच्या कर्णधार पदा वरून हकाल पट्टी करण्यात आली होती, तेव्हा बीसीसीआय चे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, चांगल्या संघांना जास्त कर्णधार नसतात आणि आता राष्ट्रीय निवडकर्त्यांनी याची पुष्टी केली आहे. रोहित शर्माची भारतीय क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

मात्र, रोहित शर्माची केवळ श्रीलंके विरुद्धच्या मालिकेसाठीच कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे की आता तो पूर्णवेळ कर्णधार आहे का, अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाला की, जोपर्यंत रोहित शर्मा उपलब्ध आहे तो पर्यंत अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार केला जाणार नाही. विशेषत: जो पर्यंत निवडकर्ते किंवा वैद्यकीय कर्मचारी सांगत नाहीत की रोहितला आता विश्रांतीची गरज आहे तोपर्यंत तो पूर्णवेळ कर्णधार असेल.

मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाला की, रोहित शर्मा हा देशातील नंबर वन क्रिकेटर आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो क्रिकेट च्या तिन्ही फॉरमॅट मध्ये खेळत आहे. एवढा मोठा क्रिकेटपटू देशाचे नेतृत्व करत असेल, तर निवड समिती म्हणून आम्हाला पुढील कर्णधार तयार करायचे आहेत. रोहित च्या नेतृत्वा खाली त्याला तयार करणे आणखी जबरदस्त असेल.

त्याने असेही म्हटले आहे की, रोहित आता तंदुरुस्त आणि ठीक आहे. आम्ही आमच्या प्रत्येक क्रिकेट पटूला विश्रांती देऊ, आम्हाला त्यांना योग्य विश्रांती द्यायची आहे. रोहित आमची पहिली निवड होती, आम्हाला कर्णधारपदी त्याचे नाव देण्यात खूप आनंद होत आहे. रोहितच्या नेतृत्वा खाली आम्ही भावी कर्णधार तयार करणार आहोत.

व्हर्च्युअल फेस कॉन्फरन्स मध्ये चेतन शर्माने असेही म्हटले आहे की, जर रोहित शर्माने दीर्घकाळ कर्णधारपद भूषवले तर ते आमच्यासाठी खूप चांगले असेल. मात्र, तो किती काळ टिकेल हे सांगणे फार कठीण आहे. पण, जोपर्यंत तो तंदुरुस्त आहे तोपर्यंत तो कर्णधार राहील. जेव्हा त्याला विश्रांती घ्यायची असेल, तेव्हा आम्ही त्याचीही व्यवस्था करू.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप, जसप्रीत बुमराह, शमी, सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप