रोहित शर्माचा Angry मूड आणि समोरच्याला सरळ सरळ कोलने, अशे काही प्रसंग तर तुम्ही पण ऐकले असतील लाईव्ह Match वर..!

भारतीय कर्णधार रोहित शर्माची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्यांची आकडेवारी पाहून याचा अंदाज येऊ शकतो. 2013 मध्ये रोहितने सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली तेव्हा पासून आज पर्येंत त्याच्या कामगिरीत लक्षणीय वाढ झाली. भारतीय कर्णधाराला हिटमॅन म्हणूनही ओळखले जाते. रोहित मैदानावरील त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, परंतु असे काही प्रसंग घडले आहेत की जेव्हा भारतीय कर्णधार मैदानावर आपला कंट्रोल गमावला. तर आज आम्ही तुम्हाला त्या ३ प्रसंगांबद्दल सांगणार आहोत जेव्हा रोहित शर्मा मैदानावर आपला स्वतः वरचा कंट्रोल गमावला.

1) रोहित शर्मा मुस्तफिजुर रहमानवर चिडला : २०१५ च्या विश्वचषकानंतर भारत बांगलादेशविरुद्ध पहिली वनडे मालिका खेळत होता. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा  मुस्तफिजुर रहमानवर रागावला. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज या सामन्यातून पदार्पण करत होता आणि धावा काढत असताना तो रोहितला धडकला असता .

यावर भारतीय रोहित शर्मा रागवला आणि त्याने मुस्तफिझूरला पुन्हा असे न करण्यास सांगितले. यावेळी त्यांच्यात काही अपशब्दांची वाणी सुद्धा झाली. या सामन्यात मुस्तफिझूरची एमएस धोनीसोबत सुद्धा चकमक झाली. मुस्तफिजूरने पदार्पणाच्या सामन्यातच 5 विकेट घेतल्या. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे भारताला हा सामना 79 धावांनी गमवावा लागला.

२) रोहित शर्माला नवदीप सैनीवर राग आला: 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान भारताचा उपकर्णधार रोहित वेगवान गोलंदाज नवदीप सैनीवर चिडला. त्यावेळी संघाचे कर्णधार असलेला विराट मैदानाबाहेर गेला होता आणि त्याच्या जागी रोहित कर्णधार होता.क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बावुमा चांगल्या फॉर्मात होते. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 12व्या षटकात आलेल्या सैनीला लागोपाठ दोन चेंडूत चौकार मारले. त्यामुळे रोहितला त्याचा राग आला आणि त्याने सैनीला त्याचा मेंदू वापरण्यास सांगितले. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला.

३) रोहित शर्माने ऋषभ पंतला अपशब्द बोलले : आपण अनेकदा एखाद्या खेळाडूला त्याच्याच सहकाऱ्याला हताशपणे शिवीगाळ करताना पाहतो. स्टंप माइकचे आहे असं खेळाडू विसरून जातात, तो काय म्हणतो ते आम्ही स्पष्टपणे ऐकू शकतो असे नेहमीच घडत असते.अशीच एक घटना 2019 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान घडली जेव्हा रोहितने ऋषभ पंतला शिवीगाळ केली आणि ही गोष्ट स्टंप माइकमध्ये कैद झाली. वेस्ट इंडिजच्या डावातील ३३व्या षटकात ऋषभने  चुकीचा थ्रो दिला होता आणि त्यामुळे रोहितने त्याला शिवीगाळ केली. या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप