रोहित शर्माला २०११ च्या विश्वचषक संघात स्थान न मिळाल्या बद्दल रोहितने सांगितले कारण..!

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने २०११ च्या विश्वचषक संघात स्थान न मिळाल्या बद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माच्या म्हणण्या नुसार, जेव्हा त्याला संघात स्थान मिळाले नाही तेव्हा तो विचारात पडला की त्याने काय चूक केली, ज्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले नाही.

भारतीय संघाने २ एप्रिल २०११ रोजी दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. श्रीलंके चा पराभव करून संघाने विश्वविजेते होण्याचा मान मिळविला होता. त्या संघात अनेक दिग्गज स्टार होते, तरीही रोहित शर्माला स्थान मिळवता आले न्हवते. ड्रीम ११ वर भारतीय महिला संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सशी संवाद साधताना रोहित शर्माने सांगितले की, जेव्हा त्याला त्याची निवड न झाल्याची बातमी मिळाली तेव्हा तो खूप विचारात पडला होता.

View this post on Instagram

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

रोहित शर्मा म्हणाला की, हे खूप अवघड आहे. विश्वचषक खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि प्रत्येकाला त्याचा भाग व्हायचे असते. याशिवाय खेळाडूलाही संघाच्या यशात हातभार लावायचा असतो. मला अजूनही आठवतं, संघ जाहीर झाला तेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेत होतो आणि मालिका खेळत होतो. माझ्याकडे तिथे कोणी नव्हते ज्याच्याशी मी बोलू शकेन. मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो की काय चूक झाली आणि मी काय चांगले करू शकलो असतो. त्यावेळेस मी केवळ २३, २४ वर्षांचा होतो आणि त्यामुळे मला माहित होते की माझ्यात अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे. मी म्हणालो मला फक्त जोरदार कमबॅक करायचा आहे. जे घडले ते बदलले जाऊ शकत नाही परंतु आपण पुढे जाऊ शकतो.

२०११ च्या विश्वचषक संघातून बाहेर पडल्या नंतर रोहित शर्माने २०१५ च्या विश्वचषक संघात स्थान मिळवले होते. २००७ मध्ये पदार्पण केल्या पासून, तो मधल्या फळीतील किंवा फिनिशर म्हणून फलंदाजी करत असे. बहुतांश सामन्या मध्ये रोहित शर्मा चुकीचा फटका खेळून बाद होत होता. दीर्घकाळ दिग्गज खेळाडूंनी त्याला साथ दिली, पण रोहितची ही सवय बदलली नाही तेव्हा त्याला सतत टीकेला सामोरे जावे लागले होते. अनेक डावांमध्ये रोहित उत्कृष्ट लयीत होता, पण अचानक चुकीचा फटका खेळल्याने तो बाद होत होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप