भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि टीमचा यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी एका लाईव्ह व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्या सोबत गप्पा मारताना रोहित शर्माला त्याच्या घरात अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची मूर्ती दिसली. ही मूर्ती पाहताच रोहितने शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. यावेळी रोहित म्हणाला,
“छत्रपती शिवाजी महाराज की जय” त्याचा असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. चला तर मग पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून रोहितने आपल्या चाहत्यांसोबत सोबत कशा गंमतीशीर गप्पा मारल्या ते!
"𝘼𝙖𝙞 𝙎𝙝𝙖𝙥𝙥𝙖𝙩𝙝"
👉 When Mumbaikars meet Mumbaikars 🤭
📹: @RishabhPant17#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 @surya_14kumar pic.twitter.com/PJIZNWb7qV
— Mumbai Indians (@mipaltan) July 27, 2022
सोशल मीडियावर दिसत असलेल्या या व्हिडिओमध्ये रोहित आणि सुर्या आपल्या एका जुन्या सहकारी मित्राशी गप्पा मारताना दिसत आहेत. सुरुवातीला त्याला अगदी खरच वाटत नव्हतं की, खुद्द रोहित शर्मा त्याच्या सोबत गप्पा मारत आहे ते! यावेळी रोहित आपल्या सोबत ऑनलाईन गप्पा मारत आहे ही गोष्ट तो आपल्या कुटुंबीयांना मोठ्या आनंदाने देखील सांगताना दिसत आहे.
त्यानंतर रोहितला तो आपल्या घरातील क्रिकेट ट्रॉफीज वगैरे दाखवत असताना त्याचवेळी रोहितला शिवाजी महाराजांची मूर्ती देखील त्या ट्रॉफीजच्या शेजारी ठेवलेली दिसते. त्या मूर्तीकडे लक्ष जाताच रोहितने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांच्या अत्यंत पसंतीस उतरलेला दिसत आहे!
श्रीलंका क्रिकेट कडून आशिया क्रिकेट परिषदेला कळवण्यात आले होते की, त्यांच्या देशावर आलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आशिया चषक ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धेच्या आयोजन करण्याच्या सद्यस्थितीत त्यांचा देश नाही.
श्रीलंकावर आलेल्या या संकटामुळे श्रीलंका क्रिकेट कडून अलीकडेच श्रीलंका प्रीमियर लीगचा तिसरा टप्पा देखील पुढे ढकलण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी श्रीलंकेकडून पुढाकार घेण्यात आलेला. यावेळी आशिया चषक स्पर्धा ही २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीच्या दरम्यान होणार आहे आणि आता ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.