रोहित शर्माच्या षटकाराने एक छोटी चिमुकली झाली जखमी, पण सामन्या नंतर रोहित शर्माने सर्वांची जिंकली मने..!

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात षटकार मारला होता आणि या षटकारामुळे एक 6 वर्षांची मुलगी जखमी झाली होती. अशा स्थितीत सामना संपल्यानंतर हिटमॅनने तिला चॉकलेटदेऊन सर्व प्रेक्षकांची मने जिंकून गेला .

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माच्या बॅटने धूम धडाका वाजला होता. यादरम्यान रोहित शर्माच्या षटकाराने ६ वर्षांची मुलगी जखमी झाली. रोहित शर्माच्या पुल शॉटवर, चेंडू वेगाने स्टँडकडे गेला, जिथे एक वडील आपल्या मुलीसह सामना पाहत होते आणि चेंडू मुलीच्या पाठीला लागला.

मैदानावर उभ्या असलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी ही माहिती संघाच्या फिजिओला दिली, त्यांनी लवकरात लवकर मुलीपर्यंत पोहोचले. बॉल मुलीच्या पाठीला लागला आणि वडिलांनी पटकन मुलीच्या पाठीला मसाज केला आणि नंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि मुलीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे आढळले. जेव्हा रोहितला मैदानावर कळले तेव्हा तो ही खूप दुःखी झाला होता. यामुळेच त्यांची नंतर भेट झाली घेऊन खूपच गोड अशी चॉकलेटे देऊन त्या मुलीला त्याने खुश केले त्याची हि एक खेळाडू वृत्तीने पूर्ण स्टेडियम मधील प्रेक्षकांनी खूपच त्याला सपोर्ट केल्याचे दिसून आले..

सामना संपल्यानंतर रोहित शर्माने मुलीला भेटून तिला चॉकलेट दिले आणि ती बरी आहे की नाही, असे विचारले. मीरा साळवी असे या 6 वर्षीय मुलीचे नाव असून ती वडिलांसोबत एकदिवसीय सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेली होती. अनेकवेळा अशा प्रकारची घटना प्रेक्षकांसोबत घडते, कारण अनेकदा सामना सुरू असताना कोणीही चेंडूकडे लक्ष देत नाही. असे झाल्यास, अनेक वेळा एखाद्याने चेंडू पकडला तर तो त्याच्या हातातून निघून समोरच्या व्यक्तीवर आदळतो.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप