रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची टी-२० मालिका जिंकली आहे. या मालिके दरम्यान कर्णधार रोहित शर्माचे एक टेन्शन संपले आहे कारण टीम इंडियाला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसारखा फिनिशर मिळाला आहे. हा खेळाडूही धोनीप्रमाणेच षटकार मारून सामना संपवतो.
वेस्ट इंडिज विरुद्ध च्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही समान योगदान दिले होते. या सामन्या दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा एक तणावही संपला आहे. खरंतर संघाला दीर्घकाळ चांगल्या फिनिशरची गरज होती. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्ती नंतर संघाला त्याच्या सारखा फिनिशर सापडला नाही. पण वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T-२० सामन्यात टीम इंडियाला धोनीसारखा फिनिशर मिळाला आहे, जो धोनीप्रमाणेच षटकार मारून सामना संपवतो. टीम इंडियाचा हा नवा फिनिशर दुसरा कोणी नसून युवा खेळाडू व्यंकटेश अय्यर आहे.
View this post on Instagram
वेंकटेश अय्यरने वेस्ट इंडिज विरुद्धच्या T-२० च्या पहिल्याच सामन्यात आपली चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेल्या १५७ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशनच्या सलामीच्या खेळीने चांगली कामगिरी केली होती, पण तो बाद होताच टीम इंडियाने आपल्या ४ विकेट झटपट गमावल्या. यानंतर व्यंकटेश अय्यर संघाला मधल्या भोवरातून बाहेर काढण्यासाठी मैदानात उतरला.
सूर्यकुमार यादवने व्यंकटेश अय्यरला मैदानात चांगली साथ दिली आणि एकही गडी न गमावता या दोघांनी संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. व्यंकटेशने षटकार मारून हा सामना जिंकावला, व्यंकटेश अय्यरची ही शैली पाहता आता कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन संपत असल्याचे दिसत आहे, कारण रोहित शर्माला संघासाठी मजबूत फिनिशरची गरज होती, जी कदाचित आता संघाला उपलब्ध आहे.
व्यंकटेश अय्यरने आयपीएल मध्ये ही आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहे. त्याने आपल्या दमदार फलंदाजी च्या जोरावर केकेआरला अंतिम फेरीत नेले होते. गेल्या वर्षी केआर साठी सलामी देताना त्याने १० सामन्या मध्ये ३७० धावा केल्या होत्या आणि ३ विकेट्सही आपल्या नावावर केल्या होत्या. व्यंकटेश अय्यरची ही फलंदाजी पाहून KKR संघाने IPL २०२२ च्या लिलावापूर्वी त्याला कायम ठेवले होते.