रोहित शेट्टीच्या एक वेबसीरिज ‘इंडियन पोलीस फोर्स’ हिने अमेझॉन Prime वरती धमाकूळ घातला आहे, पहा त्यामधील विवेक ओबेराय आणि शिल्पा..!

सध्या वेबसीरीज मध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत आणि प्रेक्षकांच्या ते विशेष पसंतीस देखील उतरत आहेत! अशातच ‘इंडियन पोलीस फोर्स’ नावाच्या एका वेबसीरिजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय! या वेबसिरीजच्या माध्यमातून रोहित शेट्टीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री मारली आहे!
रोहित शेट्टी हा ॲक्शन ब्लॉकबस्टर सिनेमा बनवण्यात तरबेज समजल्या जातो म्हणून तो यावेळी ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेब सिरीज ची निर्मिती करत आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्यानंतर आता विवेक ओबेरॉयने देखील दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या वेबसीरीज मध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. गेल्या काही दिवसापासून यातील कलाकारांचे लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल करण्यात येत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी नंतर आता विवेक ओबेरॉयचा सुपर एक्शन मोड मध्ये असलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला आहे. खाकी वर्दी आणि हातात गण असलेल्या विवेकचा हा भन्नाट लुक नेटकऱ्यांना खूप आवडलेला आहे.

ही वेबसिरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. याआधी यातील इतर कलाकारांचे देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते, त्यावेळी सुद्धा प्रेक्षकांकडून त्यांच्या फोटोला तुफान प्रतिसाद मिळालेला!

याबद्दलची माहिती देताना विवेकने इंस्टाग्राम वर एका फोटोसह पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यानी लिहिले आहे
” ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सर्वात बेस्ट फोर्स मध्ये जॉईन होत आहे, या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल रोहित शेट्टी तुझे आभार!”

हा फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर विवेकच्या फॅन्सनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली! यात एका युजरने लिहिलं की ‘खूप वर्षांनी तुला चांगली भूमिका मिळाली’ तर दुसऱ्याने लिहिलं ‘तुला पुन्हा एकदा ॲक्शन मूडमध्ये पाहून खूप चांगल वाटत आहे’ याबरोबरच तुला ‘ऑन स्क्रीन पाहण्याची खूप उत्सुकता आहे’ अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली.

” ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही सिरीज माझ्यासाठी खूपच खास आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यावर काम करत आहे, अमेझॉन प्राईम व्हिडिओने यात माझी मदत केली. ही सिरीज नवीन बेंचमार्क स्थापन करेल असा मला पूर्ण विश्वास आहे!’ अशी प्रतिक्रिया यावेळी रोहित शेट्टी यांनी दिली.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप