सुप्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अकस्मात निध’नाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. लता दीदींचे नाव हेमा होते. पण त्यांचे लता हे नाव कसे पडले यामागे एक रंजक गोष्ट आहे, तर झालं असं की लतादीदींच्या वडीलांनी त्यांचे हेमा हे नाव बदलून त्यांना लता हे नवीन नाव दिले. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका हे पात्र त्यावेळी प्रचंड गाजले होते. या पात्रावरून प्रेरित होऊन त्यानी दीदींचे हेमा हे नाव बदलून त्यांचे लता असे नूतन नामकरण केले.
View this post on Instagram
वयाच्या पाचव्या वर्षापासून लतादीदींनी वडिलांच्या नाटकात अभिनय करायला सुरूवात केली. यानंतर १९४५ साली ‘बडी माँ’ नावाचा एक सिनेमाही प्रदर्शित झालेला, या सिनेमातही त्यांनी एक छोटी भूमिका साकार केली होती.
लतादीदींनी १९३८ साली वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी राग कुंभवती आणि अन्य दोन गाणी सोलापूरमधील नूतन थिएटरच्या नाटकासाठी गायली होती. तसेच वयाच्या १३ व्या वर्षी ‘किती हसाल’ नावाच्या मराठी सिनेमासाठी त्यांनी पहिले गाणे गायले होते. पण तुम्हाला हे माहित आहे का की, सिनेमाची लांबी कमी करण्यासाठी ऐनवेळी हे संपूर्ण गाणं सिनेमातून कमी करण्यात आलं होत.
यानंतर त्याच वर्षी लतादीदींनी ‘नटली चैत्राची नवलाई’ हे गाणे ‘पहिली मंगळागौर’ या सिनेमामध्ये गायले. हे त्यांचे पहिले सुपरहिट गाणे ठरले. पुढे हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी पदार्पण केल्यावर. वसंत जोगळेकर यांच्या ‘आप की सेवा में’ चित्रपटातील सदाबहार गाण्यांनी त्यांच्या हिंदी सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली!
View this post on Instagram
लता यांना १९४८ साली पहिला मोठा ब्रेक मिळाला. मजबूर सिनेमातील ‘दिल मेरा तोडा’ हे लता दीदींच्या मधुर आवाजात स्वरबद्ध केलेले गाणं तेव्हा प्रचंड लोकप्रिय झालं. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही, त्यांची संगीत कारकीर्द ऐन बहरात होती! महल या सिनेमातील ‘आएगा, आएगा, आएगा आनेवाला’ हे गाणंही प्रचंड गाजले. त्यांचा पुढचा संपूर्ण प्रवास संपूर्ण देशाला ठाऊक आहे.
अस म्हणतात, लतादीदी त्यांच्या बालपणी फक्त एकच दिवस शाळेत गेल्या होत्या. शाळेत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी त्यांची बहीण आशासोबत इतर विद्यार्थ्यांना गाणं शिकवायला सुरुवात केलेली. त्यावेळी अचानक वर्गात आलेल्या शिक्षकांना ते मुळीच आवडलं नाही आणि ते त्यांना रागावले. या प्रसंगानंतर लतादीदी पुन्हा कधीही शाळेकडे फिरकल्या नाहीत.
लता मंगेशकर या अतिशय लहान असताना त्यांच्या कुटूंबावरील वडिलांचे छत्र हरपले. सगळ्या भावंडांमध्ये त्या मोठ्या असल्याने घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी वयात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अगदी त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला काही वेळा कोरसमध्ये गाणे देखील गायले. तसेच काही ठराविक चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी ही त्यांना मिळालेली.
लता मंगेशकर यांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नसले तरी त्यांनी त्यांच्या भावंडांना योग्य शिक्षण दिले आणि स्वतः घरची जबाबदारी उत्तमरीत्या निभावली.
सूत्रांच्या बातमीनुसार एकदा गाणे रेकॉर्ड झालं की लतादीदी ते कधीही ऐकायच्या नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी स्वत: याबाबतचा खुलासा केला होता. ‘आजपर्यंत एकदा रेकॉर्ड झालेलं गाणं मी कधीच ऐकलं नाही. मला ते ऐकायला भीती वाटायची!’ असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.