अक्षर पटेलच्या खेळी समोर शाई होपचे शतक कमी पडले, दुसऱ्या वनडेत बनले ८ ऐतिहासिक विक्रम..!

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने २ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेत मालिके वर कब्जा केला आहे. या सामन्यात कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना शाई होपचे शतक आणि निकोलस पूरनच्या अर्धशतका च्या जोरा वर वेस्ट इंडिजने ५० षटकांत ६ गडी गमावून ३११ धावा केल्या आणि भारता समोर विजया साठी ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने ४९.४ षटकात ८ गडी गमावून ३१२ धावा केल्या होत्या. त्याच बरोबर या सामन्यात अनेक विक्रमही झाले आहेत. त्या रेकॉर्ड्स वर एक नजर टाकूया.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

१०० व्या ODI मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या- १३२ सी गेल विरुद्ध इंग्लंड २००४. १२९ मोहम्मद युसूफ विरुद्ध एसएल २००२. १२४ डी वॉर्नर विरुद्ध भारत २०१७. ११५ सी केर्न्स विरुद्ध भारत १९९९. ११५ आर सरवन विरुद्ध भारत २००६. ११५ एस होप वि इंड २०२२.

२०२२ मध्ये ODI मध्ये पूरन वि ऑफ स्पिन- ९ डाव. ८४ धावा. ६ वेळा आऊट झाला. सरासरी १४.००. स्ट्राइक रेट ६१.७६.

शाई होप १०० व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा एकदिवसीय क्रिकेट च्या इतिहासातील १० वा फलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारा होप वेस्ट इंडिजचा चौथा फलंदाज ठरला आहे. आवेश खानने टीम इंडियासाठी पहिला डेब्यू सामना खेळला होता.

WI ODI मध्ये भारतीय गोलंदाजाने दिल्या सर्वाधिक धावा- ६९ – चहल*, ६८- शमी, ६८- इशांत, ६८- खलील.

२००२ पासून यशस्वी धावांचा पाठलाग करताना ४१-५० षटकात सर्वाधिक धावा- १११ पाक वि बान मीरपूर २०१४. १०५ न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड मालाहाइड २०२२. १०२ न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्राइस्टचर्च २००५. १०० Ind vs WI पोर्ट ऑफ स्पेन २०२२*. भारताकडून शेवटचे: ९१ वि जिम ऑकलंड २०१५.

वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोच्च लक्ष्याचा यशस्वी पाठलाग-
३६१ इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज ब्रिजटाऊन २०१९. ३१३ SL वि WI ब्रिजटाउन २००३. ३११ इंड विरुद्ध डब्ल्यूआय पोर्ट ऑफ स्पेन २०२२*. ३०९ WI वि पाक प्रोव्हिडन्स २०१७.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप