टीव्हीवरील ९० च्या दशकातील प्रसिद्ध मालिका शक्तिमान प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती! जिकडे पहावं तिकडे शक्तिमानची क्रेझ होती. या शोमधील शक्तिमान हे आयकॉनिक पात्र आता मोठ्या पडद्यावरून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी सोनी पिक्चर्स यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शक्तिमान मालिकेवर आधारित असणाऱ्या सिनेमाची घोषणा यातून केली होती. तब्बल १७ वर्षांनंतर शक्तिमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार झाला आहे, पण मालिकेतून नाही तर सिनेमामधून हा शक्तिमान प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे!! एका मुलाखतीदरम्यान मालिकेत शक्तिमान भूमिका करणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी या सिनेमाबद्दल सगळ्यांना माहिती दिली आहे.
View this post on Instagram
आहे ३०० कोटींचे बजेट!!
मुकेश खन्ना यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “अनेक वर्षांनी हा प्रकल्प माझ्याकडे आला आहे, लोक मला शक्तिमान 2 बनवायला सांगायचे, मला शक्तिमानला पुन्हा टीव्हीवर आणायचे नव्हते. मी सोनीच्या टीम सोबत हात मिळवला. आता किमान ३०० कोटींचे बजेट असणारा हा मोठा चित्रपट असणार आहे!
शक्तिमानची भूमिका साकारणार तरी कोण?
मुकेश खन्ना यावेळी पुढे म्हणाले की, “३०० कोटी रुपयांचे बिग बजेट असलेला हा चित्रपट बनवायला नक्कीच वेळ लागेल. पण हा चित्रपट देशी संकल्पनेवर आधारित असेल. हा चित्रपट स्पायडरमॅनचे निर्माते बनवत असले तरी आपला शक्तिमान मात्र देसीच असणार आहे! चित्रपटाची कथा मी माझ्या पद्धतीने तयार केली आहे, माझी एक अट होती की चित्रपटाची कथा बदलणार नाही. आता लोक विचारत आहेत कोण होणार शक्तिमान? खरतर हा देखील खूप मोठा प्रश्न आहे, त्याचे उत्तर मी देणार नाही परंतु मुकेश खन्ना शिवाय शक्तिमान होणार नाही हे देखील निश्चित आहे!”
View this post on Instagram
शक्तिमान ही मालिका १३ सप्टेंबर १९९७ रोजी टीव्हीवर प्रदर्शित होण्यास सुरवात झालेली. २००५ पर्यंत शक्तिमान ही मालिका टेलिव्हिजन वर प्रदर्शित होत होती. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी गंगाधर आणि शक्तिमान या दोन भूमिका साकारल्या. आता शक्तिमान या सिनेमाची वाट प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहताना दिसत आहेत. परंतु अद्यापही या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.