ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स मध्ये सामील झाला आहे. तो रिकी पाँटिंगला असिस्ट करताना दिसणार आहे. शेन वॉटसनने या दोन भारतीय खेळाडूंना त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कर्णधार म्हणून सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत त्याने अतिशय धक्कादायक उत्तर दिले आहे. त्याला असा प्रश्न विचारण्यात आला की आता पर्यंत तू कर्णधारा खाली खेळला आहेस, त्यापैकी कोण सर्व श्रेष्ठ आहे. ज्याला उत्तर देताना शेन वॉटसन म्हणाला की हा प्रश्न खूप अवघड आहे.
पण शेन वॉर्न, रिकी पाँटिंग, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी हे त्या पैकी एक आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघात खेळताना तो राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळला होता. तर गेल्या काही वर्षांपासून तो आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसला होता.
View this post on Instagram
ऑस्ट्रेलिया साठी अनुभवी खेळाडू असलेल्या शेन वॉटसन ने याच मुलाखतीत मिचेल जॉन्सनला सर्वात मेहनती खेळाडू आणि ख्रिस गेलला सर्वाधिक सेल्फी घेणारा खेळाडू म्हटले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फो च्या त्या मुलाखतीत, खेळाडूच्या वैयक्तिक आणि क्रीडा जीवनाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते.
शेन वॉटसन दीर्घकाळा पासून आयपीएल चा भाग आहे. २०२० मध्ये निवृत्त होण्यापूर्वी, तो चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग होता आणि अनेक महत्त्वाच्या सामन्या मध्ये त्याने एकहाती सामने जिंकवले होते. तो राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून ही खेळला आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दी बद्दल बोलायचे तर त्याने १४५ सामन्या मध्ये ३०.९९ च्या सरासरीने १३७.९१ च्या स्ट्राइकरेटने ३८७४ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर ९२ विकेट्स आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या ७ आवृत्त्यांमध्ये वॉटसन राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता. २००८ च्या IPL च्या पहिल्या आवृत्तीत, त्याने चार अर्धशतका सह तीन मुख्य सामने आणि उपांत्य फेरीत आपल्या संघाला स्पर्धा जिंकण्यात मदत केली होती. त्याने १७ विकेट्स घेतल्या आणि त्याच्या पहिल्या बारा सामन्या पैकी चार सामन्या मध्ये त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले आणि मालिकावीराचा किताबही मिळाला होता.