शिखर धवनने विंडीजच्या मैदानावर रचला विक्रमांचा धुमाकूळ, पहिल्या एकदिवसीय सामन्यात केले ३ मोठे विक्रम..!!

वेस्ट इंडिज आणि भारत  यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळला गेला. भारतीय संघाने हा रोमहर्षक सामना 3 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्याच वेळी, या सामन्यात ९ मोठे विक्रम देखील केले. या विजयाबरोबर अनेक विक्रम सुद्धा झाले आहेत.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ आणि यजमान संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळला गेला. भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा तीन धावांनी पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजसमोर ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. वेस्ट इंडिज संघाला निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून ३०५ धावाच करता आल्या. तत्पूर्वी, शुभमन गिलने ६४ धावा करून पुनरागमन केले तर कर्णधार शिखर धवनचे शतक तीन धावांनी हुकले पण या जोडीने शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताला ७ बाद ३०८ धावा केल्या.

१. भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा (१५० डावांनंतर): तब्बल १५० सामन्यानंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करण्यात शिखर धवनला  यश आले आहे आणि तो आता पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.  ६५३७ -एस धवन*,  ६४२२ – विराट कोहली,  ६०६४ – एस. गांगुली,  ५४२३ – एस तेंडुलकर.


२. सर्वात जलद १००० ODI धावा करणारा भारतीय: शिकार धवन ने काल  चांगली कामगिरी करून आणखी एक विक्रम तोडला आहे त्याने सर्वात जलद १००० हुन जास्त धाव करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अस करणारा तो पहिलाच खलाडू ठरला आहे. २४ डाव – शिखर धवन, २४ डाव – विराट कोहली २४ डाव – श्रेयस अय्यर,
२५ डाव – नवज्योत सिद्धू.

३. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्या: भारतीय संघ आणि यजमान संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील भारतीय संघाने हा रोमहर्षक सामना शिखर धवनच्या नेतृत्व खाली ३ धावांनी जिंकला. त्याबरोबर च  वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्याकरणारा हा पहिला कर्णधार ठरला आहे. विराट कोहली – १०२, शिखर धवन – ९७.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप