भारतीय संघाचा सलामी वीर शिखर धवनने वरिष्ठ खेळाडूंना पुन्हा पुन्हा विश्रांती देण्याच्या प्रश्ना वर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे त्याने समर्थन केले आहे. शिखर धवनने म्हटले आहे की, जर एखाद्या खेळाडूने सतत क्रिकेट खेळले तर त्याला खूप मानसिक थकवा येतो आणि त्यामुळेच खेळाडूंना ठराविक अंतराने ब्रेक द्यायला हवा.
यावेळी भारतीय संघात विराट कोहलीने सर्वाधिक ब्रेक घेतले आहेत. तो वेस्ट इंडिज विरुद्ध च्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेचा भाग नव्हता आणि तो झिम्बाब्वे दौऱ्या वर ही जाणार नाही. म्हणजेच विराट कोहली आता थेट आशिया कप मध्ये खेळताना दिसणार आहे. टी-२० विश्वचषका पासून कोहलीने बराच ब्रेक घेतला आहे. याशिवाय रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना ही संघ व्यवस्थापनाने वेळो वेळी ब्रेक दिला आहे.
View this post on Instagram
वरिष्ठ खेळाडूंना एवढी विश्रांती देण्या वर अनेक क्रिकेट दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शिखर धवनने त्याचे समर्थन केले आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना तो म्हणाला, जर एखाद्या खेळाडूला त्याचे १०० टक्के द्यायचे असतील, तर त्याच्या साठी पूर्ण पणे फ्रेश असणे खूप महत्त्वाचे आहे. जर एखादा खेळाडू परत मागे खेळत असेल तर तो मानसिक दृष्ट्या खूप खचून जातो. मानसिक विश्रांती खूप महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये खेळाडूंना विश्रांती मिळावी म्हणून रोटेशन चालू असते. एखाद्या खेळाडूने जास्त प्रवास केला तर तो थकतो.
शिखर धवन पुढे म्हणाला, क्रिकेटर्स देखील माणूसच असतात. जे वरच्या स्तरा वर बसले आहेत ते हे समजून घेतात आणि त्यानुसार नियोजन करतात.