शिखर धवनचे पुन्हा तुटले हृदय, धवनच्या सावळ्या रंगामुळे या मुलीने प्रपोज केला होता रिजेक्ट..!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये पंजाब किंग्ज संघ आता पर्यंत चांगली कामगिरी करत आहे. मैदाना बाहेरही खेळाडूंची मजा सुरूच असते. टीम इंडिया आणि पंजाब किंग्जचा ‘गब्बर’ शिखर धवन ही चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहे. शिखर धवनने आता एक मजेदार मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने त्याचे अनेक किस्से सांगितले आहेत.

मित्रांनो, आयपीएलचा हा मोसम अतिशय प्रेक्षणीय आणि रोमांचक पद्धतीने खेळला जात आहे. तोच भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवन यावेळच्या आयपीएल मध्ये पंजाब किंग्ज संघात सहभागी होऊन खेळत आहे. पण अलीकडेच या स्टार फलंदाजा ने खुलासा केला आहे की एकदा एका मुलीने केवळ त्याच्या रंगा मुळे त्याचा प्रपोज नाकारला होता. पंजाब किंग्स ने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्या मध्ये धवन ने स्वतःच्या जुन्या आठवणी सांगताना सांगितले की, त्याने अनेक वर्षां पूर्वी एका मुलीला कसे प्रपोज केले होते, मात्र या मुलीने त्याला नकार दिला, फक्त शिखर धवनचा रंग पाहून. मात्र, यावेळी तरुणीने न ऐकल्याने शिखरने तिला कोहिनूर हिरा नाकारल्याचे ही सांगितले. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये शिखर धवन सांगतो की, एकदा मी एका मुलीला प्रपोज केले होते. पण तिने मला नकार दिला होता. त्यावेळी आम्ही खेळत होतो आणि माझा चेहरा सावळा होता. मग तिच उत्तर ऐकून मी तिला काय सांगितलं माहीत आहे का? मी तिला सांगितले की तू कोहिनूर हिरा नाकारला आहेस.

शिखर धवन बद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी च्या आयपीएल सामन्यामध्ये धवनने अनेक मोठ्या खेळी खेळल्या होत्या. शिखर धवनच्या आयपीएल कारकिर्दी बद्दल बोलायचे झाले तर धवन ने शानदार ५८७६ धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांका वर आहे. त्याने या स्पर्धेत आता पर्यंत २ शतके आणि ४४ अर्धशतके केली आहेत. याशिवाय शिखर धवन सध्या ३६ वर्षांचा असून चालू हंगामातील ३ सामन्यां मध्ये धवन ने आता पर्यंत ९२ धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जने आयपीएल मध्ये आता पर्यंत ३ सामने खेळले असून, दोन जिंकले आहेत आणि एकात पराभव पत्करावा लागला आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप