शिखर, श्रेयस आणि गिल या तिघांनी केले विक्रम, तिसऱ्या वनडेत केले ९ ऐतिहासिक विक्रम..!

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्या तील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसा मुळे सामना ३५ षटकांचा झाला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३ गडी गमावून २२५ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या २६ षटकांत १३७ धावांत सर्व बाद झाला होता. त्यामुळे भारताने हा सामना ११९ धावांनी जिंकला होता. यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ही भारताने ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. त्याच बरोबर या सामन्यात काही विक्रमही झाले आहेत.

गेल्या १० वर्षांत पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारताची सुरुवातीची भागीदारी- १२३, १३२, ११४, २, २५, ११९, ४८, ११३.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दोनदा (पहिल्या आणि तिसऱ्या वनडेत) भारताच्या सलामीच्या फलंदाजा मध्ये शतकीय भागीदारी झाली.

शिखर धवनने त्याच्या ODI कारकिर्दीतील ३७ वे अर्धशतक झळकावले.

शुभमन गिलने त्याच्या ODI कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले.

वेस्ट इंडिजला तीन सामन्यांत पॉवरप्ले मध्ये एकही विकेट घेण्यात यश आले नाही- पहिली वनडे: ७३/०, दुसरी वनडे: ४२/०, तिसरी वनडे: ४५/०.

शुभमन गिलची सर्वोच्च धावसंख्या- टेस्ट – ९१, आयपीएल – ९६, एकदिवसीय – ९८*.

२७ डावा नंतर भारता साठी सर्वाधिक एकदिवसीय धावा- ११४० – नवज्योत सिद्धू, ११०० – शिखर धवन, ११०८ – श्रेयस अय्यर*, १०५४ – विराट कोहली.

परदेशात एकदिवसीय सामन्या मध्ये भारतीय सलामीवीरा कडून सर्वाधिक ५०+ धावा- ७१- सचिन तेंडुलकर, ५१ – सौरव गांगुली, ३७ – शिखर धवन*, ३७ – रोहित शर्मा.

श्रेयस अय्यर विरुद्ध एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज- ७१, ६५, ७०, ५३, ७, ८०, ५४, ६३, ४४.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप