आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. या वर्षी सुद्धा IPL ला तेवढेच भरभरून प्रेम मिळत आहे कारण या वर्षी ८ नाहीत तर तब्बल १० संघ एकमेकांसमोर मैदानात उतरणार आहेत.
आता खबर येत आहे की, बुधवारी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यातील सामन्याबाबत साशंकता आहे. दिल्ली कॅम्पमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अशा परिस्थितीत उद्या काही कोरोना चाचण्या झाल्यानंतरच या सामन्याबाबत निर्णय घेतला जाईल. दिल्ली कॅपिटल्स संघातील आणखी काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
View this post on Instagram
मिशेल मार्शची पुन्हा चाचणी केल्यानंतरही तो पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचे सीटी व्हॅल्यू १७ असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय एक डॉक्टर, सोशल मीडिया टीमचा एक सदस्य आणि हॉटेलच्या तीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सदस्यांची कोरोना चाचणी करून उद्यापर्यंत अहवाल दिसेल आणि त्यानंतर पुढील सामन्याबाबत निर्णय घेतला जाईल.
यापूर्वी दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली होती. यानंतर ते वेगळे झाले आणि संघाचा पुण्याला जाण्याचा कार्यक्रम पुढे ढकलून खेळाडूंना क्वारंटाइनमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खबरदारी म्हणून दिल्ली संघाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत आणखी काही चाचण्या घेण्याचे ठरले असून आता या सामन्याबाबत साशंकता आहे. मिशेल मार्शबद्दल ट्विट करताना एका ज्येष्ठ पत्रकाराने सांगितले की, त्यांची सीटी व्हॅल्यू १७ आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल.
विशेष म्हणजे या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी तितकीशी चांगली राहिलेली नाही. दिल्लीने आतापर्यंत एकूण ५ सामने खेळून२ जिंकले आहेत. तो गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यांच्या खाली चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सची नावे आहेत. अशा स्थितीत दिल्लीच्या संघाचा समावेश सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये झाला आहे, असे म्हणता येईल. आगामी काळात त्याची कामगिरी कशी असेल हे पाहायचे आहे.