भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावली असून आता या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-२० चे कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.
आज अचानक विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने सोशल मीडियावर ही माहिती दिली. विराट कोहलीचा हा निर्णय धक्कादायक आहे. विराट कोहलीने पोस्ट केले की, “सात वर्षे कठोर परिश्रम केले आहेत आणि आम्ही एक अद्भुत संघ बनवला आहे. मी माझे काम पूर्ण निष्ठेने केले. अनेक चढ-उतार आले, पण मी स्वतःवरचा विश्वास कधीच गमावला नाही. मी माझ्या कडून १००% प्रयत्न केले आणि जेव्हा मी आता माझे १००% देऊ शकत नाही.त्यामुळे मला वाटले की आता वेळ आली आहे. मी बीसीसीआयचा आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली. रवी शास्त्री यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि सर्व सहकारी खेळाडूंनी मला पाठिंबा दिला. त्याशिवाय, मला कर्णधारपदाची संधी दिल्याबद्दल मी महेंद्रसिंग धोनीचाही आभारी आहे.
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. भारताने इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेतही दोन कसोटी सामने जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली.
वृत्तानुसार, बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यात मतभेद आहेत, ज्यामुळे विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि आता विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
२००२ मध्ये विराट कोहलीचा प्रथमच दिल्ली अंडर-१५ संघात समावेश करण्यात आला होता. त्याच वर्षी विराट कोहलीने अओनी संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे खूश होऊन त्याला पुढील हंगामासाठी संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. विराट कोहलीने आतापर्यंत १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५५ च्या सरासरीने आणि ९१ च्या प्रभावी स्ट्राईक रेटने ८५८७धावा केल्या आहेत. यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर शतके आणि अर्धशतके आहेत.