इशान किशनने धक्कादायक पाऊल, भारताकडून नाही तर या देशातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये खेळणार आहे..!

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या टीम इंडियाच्या संघाबाहेर आहे. इशान किशनला इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत संधी देण्यात आली नाही. तर या मालिकेत ध्रुव जुरेलसारख्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ishan Kishan (@ishankishan23)

इशान किशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ  यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे इशान किशनला संघात संधी मिळत नाहीये. तर बीसीसीआय आता इशान किशनलाही राष्ट्रीय करारातून वगळू शकते. त्यामुळे आता इशान किशन मोठा निर्णय घेऊन टीम इंडिया सोडून दुसऱ्या देशासाठी क्रिकेट खेळू शकतो.

इशान किशन घेऊ शकतो मोठा निर्णय : टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आता मोठा निर्णय घेऊन टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो आणि अमेरिकेच्या संघासाठी क्रिकेट खेळू शकतो. कारण, अमेरिकेचा संघ आपल्या संघाकडून खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंशी संपर्क साधतो.

View this post on Instagram

A post shared by Ishan Kishan (@ishankishan23)

टीम इंडियाचे अनेक खेळाडू आहेत जे भारतीय संघात स्थान न मिळाल्याने आता अमेरिकेतून क्रिकेट खेळतात. त्यामुळे आता इशान किशनही मोठा निर्णय घेऊन अमेरिकेसाठी क्रिकेट खेळू शकतो. इशान किशन अखेरचा नोव्हेंबर २०२३ मध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसला होता. तेव्हापासून त्याला टीम इंडियात संधी मिळत नाहीये.

इशान किशन आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे इंडियन प्रीमियर लीग 22 मार्चपासून सुरू होऊ शकते आणि अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाऊ शकतो. इशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळतो.

टीम इंडिया सध्या इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळत आहे. ज्यामध्ये ईशानला संधी मिळालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता इशान किशन फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. इशान किशनला आयपीएलमध्ये वर्षाला 15.25 कोटी रुपये मिळतात.

इशान किशनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द: ईशान किशन टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. ईशानने २०२१ साली भारतीय संघात पदार्पण केले. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी 2 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 32 टी-20 सामने खेळले आहेत. ईशानने आतापर्यंत कसोटीत 78 धावा केल्या आहेत. तर वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 933 आणि 796 धावा आहेत. तर इशान किशनने बांगलादेशविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्येही द्विशतक झळकावले आहे. तर IPL मध्ये इशान किशनने 91 सामन्यात 2324 धावा केल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top