चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला युवराज सिंग सारखा सिक्सर किंग, चेन्नईला एकतर्फी विजयी मिळवून देऊ शकतो हा खेळाडू..!

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२२ च्या लिलावात युवराज सिंग सारख्या सिक्सर किंग्सला विकत घेतले आहे. चेन्नईने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. आता चेन्नई सुपर किंग्जच्या नजरा पाचव्या आयपीएल विजेतेपदावर असतील. युवराज सिंगसारखा हा ख’तरनाक आणि स्टायलिस्ट क्रिकेटर दुसरा कोणी नसून शिवम दुबे. शिवम दुबेला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. २६ वर्षीय अष्टपैलू शिवम दुबे भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला या मेगा लिलावात बरीच मागणी दिसत होती. गोलंदाजी आणि फलंदाजीचा पर्याय देणाऱ्या या खेळाडूसाठी एकूण ३ फ्रँचायझींनी लिलाव कक्षात बोली लावली होती. त्यापैकी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जला शिवमला आपल्या संघाचा भाग बनवायचे होते. शेवटी, ५० लाख रुपयांच्या मूळ किंमतआलेल्या या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्जने ४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.

डाव्या हाताचा फलंदाज शिवम दुबे मोठ-मोठे षटकार ठोकू शकतो. रणजी ट्रॉफी सामन्यात शिवम दुबेने डावखुरा फिरकी गोलंदाज स्वप्नील सिंगच्या एका षटकात पाच षटकार मारले होते. त्याने एका षटकात सहा षटकार मारण्याच्या रवी शास्त्रीच्या विक्रमाशी बरोबरी करू शकला नाही. अप्रतिम कामगिरी केल्या नंतर शिवम दुबेला बरीच ओळख मिळाली होती.

शिवम ज्या पद्धतीने षटकार मारतो, त्याच्यात युवराज सिंगची झलक पाहायला मिळते, शिवम डाव्या हाताने वेगवान गोलंदाजीही करतो. शिवम दुबेने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत २४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १२० च्या स्ट्राइक रेटने ३९९ धावा केल्या आहेत. यावेळी शिवमच्या खात्यात ४ विकेट्स आल्या आहेत. भारतीय देशांतर्गत स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर शिवमचाही टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. त्याने आतापर्यंत १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी २१६ धावा केल्या आहेत आणि ५ बळीही घेतले आहेत.

शिवम दुबेसाठी १३ फेब्रुवारीचा दिवस आनंदाची भेट घेऊन आला आहे. मेगा लिलावात मोठ्या बोलीच्या पुढे शिवमच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पत्नी आणि मुलाचा फोटो शेअर करून ही माहिती दिली. या फोटोमध्ये लिटिल चॅम्प शिवमची पत्नी अंजुमच्या मांडीवर दिसत आहे. फोटो शेअर करताना टीम इंडियाच्या या खेळाडूने लिहिले की, आमच्या आयुष्यात आनंद आला आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप