कसोटी क्रिकेटमधील सचिनचा हा सर्वात मोठा विक्रम तोडणार स्मिथ, असे करणारा तो पहिला खेळाडू ठरणार..!

सध्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक, उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज स्टीव्ह स्मिथ आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम करत आहे. स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सतत लांबलचक डाव खेळून खूप धावा करत आहे. स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघासाठी ८५ कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेदरम्यान स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्टीव्ह स्मिथने केवळ ८ हजार धावाच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतरही अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

कसोटीत सर्वात जलद ८०० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्टीव्ह स्मिथने सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा यांना मागे टाकले आहे. स्टीव्ह स्मिथचे सध्याचे वय केवळ 35 वर्षे आहे आणि तो येत्या ५, ६ वर्षे आरामात क्रिकेट खेळू शकतो. स्टीव्ह स्मिथने हा पराक्रम ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान केला. स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये केवळ १५१ डाव खेळताना हा विक्रम पूर्ण केला.

हा विक्रम करण्यासाठी कुमार संगकाराला १५२  डाव आणि सचिन तेंडुलकरला हा विक्रम करण्यासाठी १५४ डाव लागले होते. कसोटी क्रिकेटमध्ये केवळ ८००० धावाच नव्हे तर सर्वात जलद ७००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्टीव्ह स्मिथचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथने केवळ १२६ डावांमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथच्या सुवर्ण क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत२९  विकेट्समध्ये ८५ कसोटी सामन्यांच्या १५१  डावांमध्ये एकूण ८०१० धावा केल्या आहेत.

स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २७ शतके आणि तीन द्विशतके झळकावली आहेत. स्टीव्ह स्मिथची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या २३९ धावा आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथने १२९ सामन्यांमध्ये ४३७८ धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ११ शतके आणि २५ अर्धशतके झळकावली आहेत. स्टीव्ह स्मिथची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या १६४ धावा आहे. ऑस्ट्रेलिया टी-२० क्रिकेट संघासाठी स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत५७  सामन्यात९८२  धावा केल्या आहेत. एकूणच, स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप