लवकरच नागा चैतन्या सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार ‘बालिका वधू’ फेम अविका गौर! अविकाचा ग्लॅमरस अवतार पाहून व्हाल थक्क!!

हिंदी कलर्सच्या माध्यमातून ‘बालिका वधू’ नावाच्या मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली बालकलाकार म्हणजे अविका गौर! आपल्या निरागस चेहऱ्याने आणि गोड अभिनयाने अविका आनंदीची भूमिका अक्षरशः जगली होती! आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले विशेष स्थान प्राप्त करण्यात तिने यश मिळवले होते.

अविकाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. या शोमधून ती घरोघरी ओळखली जाऊ लागली. ‘बालिक वधू’ची ही छोटी आनंदी आता मोठी झाली आहे आणि सोशल मीडियावर सतत आपले फोटो शेअर करत असते. अविकाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, नुकताच अविकाचा म्युझिक व्हिडीओ ‘दिल को मेरे’ प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांकडून खूप नावाजलं गेलेलं! हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Avika Gor (@avikagor)

अविका आता २४ वर्षांची झाली आहे. आणि आता ती विविध मालिका आणि चित्रपटांमधून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. बालिका वधू नंतर अविका गौर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत रोलीच्या भूमिकेत झळकताना दिसली होती. तिची ही भूमिकासुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरली होती. बालिका वधू मधील छोटी आनंदी ते यातील मॉडर्न रोली दोघींचा ही अभिनय पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते!!

काही दिवसांपूर्वीच अविका गौरने आपल्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामच्या हँडलवरून आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. या फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झालेले आहेत. अविका गौर पर्सनल आयुष्यात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली दिसते. आणि ती सतत आपले बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो तेथे अपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

View this post on Instagram

A post shared by Avika Gor (@avikagor)

आता अविका साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य यासोबत ‘थँक यू’ या आगामी चित्रपटात झळकणार असल्याचे समजते. यामध्ये मुख्य अभिनेत्रीच्या रूपात राशी खन्ना असणार असून, अविका त्यात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच येत्या काळात अविका ’10th Class Diaries cast’ नावाच्या चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यापूर्वीही तिने काही साऊथ चित्रपटात अभिनय केला आहे. तसेच ती अनेक टीव्ही मालिकांमधून ही घराघरात पोहोचली आहे!

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप