प्लेऑफ मध्ये ठेवले पाऊल, तर आता श्रेयस अय्यर फेरबदल करणार का? गुजरात विरुद्ध KKR ची प्लेइंग इलेव्हन अशी असेल..!

KKR हा IPL 2024 मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. 11 मे रोजी झालेल्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा पराभव केला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अप्रतिम आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यांत 9 विजय मिळवून कोलकाता 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. केकेआरचा आगामी सामना गुजरात टायटन्सविरुद्ध १३ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. अशा स्थितीत अय्यर आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंना संधी देऊ शकतो.

GT vs KKR: सॉल्ट आणि नारायण डावाला सुरुवात करतील:

  1. आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सुनील नारायण आणि फ्लिप सॉल्ट या जोडीने खळबळ उडवून दिली आहे. दोन्ही खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि जवळपास सर्वच सामन्यांमध्ये ते उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत.
  2. आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये सॉल्टने 39.55 च्या सरासरीने 435 धावा केल्या आहेत, तर नारायणने 12 सामन्यात 38.42 च्या सरासरीने 461 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत ते दोघेही जीटीवर आग लावू शकतात.

नितीश राणा परतल्यानंतर मिडल ऑर्डर मजबूत आहे:

  1. व्यंकटेश अय्यर केकेआरसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. मागील सामन्यातही त्याने 21 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. याशिवाय श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्याच्याशिवाय नितीश राणा आता केकेआरमध्ये परतला आहे.
  2. दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. त्याने परतीच्या सामन्यातच ३३ धावांचे योगदान देत संघातील आपले स्थान निश्चित केले.
  3. रिंकू सिंग, आंद्रे रसेल आणि रमणदीप सिंग खालच्या फळीत जबाबदारी सांभाळतील. या मोसमात रसेल त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या गोलंदाजीनेही छाप पाडत आहे. रसेलने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात 185 च्या मजबूत स्ट्राईक रेटने 222 धावा केल्या आहेत.

GT vs KKR: हे गोलंदाजी आक्रमण असेल:

  1. फिरकी गोलंदाजीत सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकीची जादू चांगलीच चालली आहे. चक्रवर्तीने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात 18 बळी घेतले आहेत.
  2. वेगवान गोलंदाजीत मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि आंद्रे रसेल महत्त्वाच्या भूमिका बजावतील. हर्षित डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी करतो. मागील सामन्यातही हर्षितने शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करत कोलकाताला २ विकेट्स मिळवून विजय मिळवून दिला होता.

GT विरुद्ध KKR ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *