IPL २०२० मध्ये विराट कोहली सोबत झालेल्या वादावर सूर्यकुमार यादवने केले मोठे वक्तव्य, सांगितली संपूर्ण गोष्ट..!

२०२० च्या आयपीएल दरम्यान विराट कोहली आणि सूर्य कुमार यादव यांच्यात जोरदार वाद झाला होता, ज्याने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. हा आयपीएल चा ४८ वा सामना मुंबई आणि बेंगळुरू यांच्यात अबुधाबी च्या मैदाना वर खेळवला जात होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्या साठी आलेल्या आरसीबी संघाने मुंबई समोर १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात मुंबई ने आपला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव च्या ४३ चेंडूत ७९ धावांच्या शानदार खेळी मुळे हा सामना जिंकला होता. मात्र या सामन्या पेक्षा विराट आणि सूर्या यांच्यातील वादाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ब्रेक फास्ट विथ चॅम्पियन्स या YouTube शो मध्ये विराट कोहली सोबत घडले ल्या या घटने ची आठवण करून देताना सूर्य कुमार यादव म्हणाला, ही त्याची शैली आहे. मैदाना वरील त्याची ऊर्जा पातळी नेहमीच वेगळी असते. तो सामना दोन्ही संघा साठी खूप महत्त्वाचा होता, त्या मुळे त्या सामन्यातील विराट ची स्लेजिंग आणखी एका पातळी वर होती. मी स्वतः वर लक्ष केंद्रित करत होतो, मी स्वतःला म्हणत होतो की, बॉस तू फोकस गमावू शकत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकला पाहिजे. चेंडू त्याच्या कडे गेला आणि त्याने तिथून ती कृती केली आणि ते खूप सहज होते.

View this post on Instagram

A post shared by Surya Kumar Yadav (SKY) (@surya_14kumar)

मुंबई चा हा स्टार फलंदाज पुढे म्हणाला की, मला अजून आठवते की त्या वेळी मी च्युइंगम खात होतो. तो काही बोलत नव्हता, मी ही काही बोलत न्हवतो. मी स्वतःला सांगत होतो काहीही झाले तरी एक शब्द ही बोलू नकोस. ही १० सेकंदांची बाब आहे. या नंतर नवीन षटक सुरू होईल. हे फार काळ टिकणार नाही. ती परिस्थिती बदलली आणि मग मी त्याला मॅच नंतरच पाहिलं.

आयपीएलचा हा मोसम सूर्यकुमार यादव साठी खूप छान होता. त्या वर्षी मुंबई कडून खेळताना त्याने चार अर्धशतकाच्या मदतीने ४८० धावा केल्या होत्या. त्याच्या चमकदार कामगिरी मुळे मुंबई ला आयपीएल चे पाचवे विजेते पद पटकावण्यात यश आले होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप