टीव्ही वरती सेट मॅक्स चॅनल हे इतर महिन्यांपेक्षा एका वेगळ्याच कारणामुळे सतत चर्चेत राहते, ते म्हणजे त्याच्यावर कायमच लागणारा अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा सिनेमा! आजही आठवड्यातून एकदा हा सिनेमा सेट मॅक्सवर दाखवला जातो. त्यामुळे आताच्या नव्या पिढीला ही या चित्रपटाची ओळख पूर्णपणे पटली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मागील वीस-पंचवीस वर्षांपासून हा चित्रपट सातत्याने सेट मॅक्स वर प्रसारित होत राहिलेला आहे.
बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत रोमँटिक ते थ्रिलर, फायटिंगचे वेगवेगळ्या कथानकाचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिले. परंतु अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम या सिनेमाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही! त्यामुळे आजही आठवड्यातून एकदा तरी हा चित्रपट सेटमॅक्सवर दाखवण्यात येतो. मात्र आता गेल्या २०-२५ वर्षांपासून सातत्याने दिसणारा हा सिनेमा यापुढे कधीही दाखवण्यात येणार नसल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे, कारण सोनी tv चे सूर्यवंशम चित्रपटाचे ऍग्रीमेंट संपले असून ऍग्रीमेंट रिन्यू करण्याचा सोनी चा विचार नाही असं म्हंटलं जात आहे त्याऐवजी बॉलिवूडमधील हे नवीन चित्रपट दाखवण्यात येणार
असल्याचे समजते.
१ टारझन ~ द वंडर कार: काही वर्षांपूर्वी टारझन द वंडर कार रोमँटिक सिनेमा आला होता. यामध्ये एका गाडीची कथा सांगण्यात आली आहे. आपल्या शत्रूच्या बदला घेण्यासाठी एक कार अचानकपणे कशी जिवंत होते आणि आपला सूड कसा पूर्ण करते हे या चित्रपटातून दाखवण्यात आल आहे. या सिनेमामध्ये अजय देवगन, वत्सल शेठ अमरीश पुरी” आयशा टाकिया, शक्ती कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
२ विवाह: सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा अत्यंत प्रसिद्ध झालेला चित्रपट म्हणजे विवाह! आता हा सिनेमा सेट मॅक्स झळकणार असल्याचे म्हंटले जात आहे. या सिनेमात अमृता राव आणि शाहिद कपूर हे दोन मुख्य कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. कदाचित चित्रपट सूर्यवंशम या सिनेमाला रिप्लेस करू शकतो.
३ बागबान:एक फॅमिली ड्रामा म्हणून बागबान हा सिनेमा प्रसिद्ध आहे. यात अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे.
४ जानी दुश्मन: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम याने अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं तो सिनेमा म्हणजे जानी दुश्मन! राजकुमार कोहली दिग्दर्शित या सिनेमामध्ये अक्षयकुमार, अरमान कोहली, सुनील शेट्टी, सनी देओल आणि मनिषा कोईराला यांसारखे नामांकित कलाकार भूमिका साकारताना दिसले आहेत.
५ आबरा का डाबरा: या सिनेमात एका लहान मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे, जो आपल्या वडिलांना परत मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो, या सिनेमात अनुपम खेर, विशाल, अर्चना पुरण सिंह, हंसिका मोटवानी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
६ हम साथ साथ है: हा चित्रपट आता चॅनेलवर दाखवला जाऊ शकतो. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
७ मेरी जंग~ वन मॅन आर्मी: साउथ कडील सुपरस्टार नागार्जुन याची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट म्हणजे ॲक्शन सीनचा पुरेपूर भरणा! या चित्रपटात नागार्जुन सह राहुल देव आणि ज्योतिका यांच्या मुख्य भूमिका आहेत.
८ लोफर: जुही चावला आणि अनिल कपूर ही जोडी या सिनेमात झळकली असून, कॉमेडी ड्रामा या जॉनर मधील हा सिनेमा आहे ज्याचे दिग्दर्शक डेव्हिड धवन आहेत.
९ गदर एक प्रेम कथा: भारत-पाक फाळणीच्या वेळची एक प्रेम कथा या सिनेमात दाखवली आहे. यात सनी देवल, अमिशा पटेल, अमरीश पुरी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
१० खलनायक: हा एक क्राइम थ्रिलर सिनेमा असून यात प्रेमाचा ट्रँगल दाखवलेला आहे. माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार यात मुख्य भूमिकेत झळकले आहेत.