TATA बनणार आयपीएल 2022 ची स्पॉनसर, Vivo ने या कारणामुळे सोडली स्पॉन्सरशिप..!!

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे, त्यामुळे आयपीएलचे क्रीडा विश्वात मोठे नाव आहे. आयपीएलमुले भारतीय क्रिकेट मध्ये खूप पैसा आला आहे आणि आयपीएलने खेळाडूंचे नशीब बदलले आहे. आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर खूप मोठ्या कंपन्या आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक कंपनी आयपीएलचे मुख्य स्पॉनसरशिप मिळवण्यासाठी मोठा पैसा लावते.

२०१८ मध्ये, Vivo ने IPL सोबत ४४० कोटी रुपयांचा करार केला होता, जो २०२२ पर्यंत होता. विवो ही एक चिनी कंपनी आहे, ज्यामुळे अनेक वादामुळे विवोने २०२० मध्ये ड्रिम इलेव्हनला त्याचे स्पॉनसरशिप देण्यात आली. आता विवोकडे मुख्य स्पॉनसर होते, जे आज विवोने टाटा कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे, जिने जगभरात भारताचे नाव प्रसिद्ध केले आहे.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

Vivo ने पुढील २ वर्षांसाठी आपले मुख्य स्पॉनसरशिप टाटाला देण्याचे ठरवले आहे आणि टाटाला दिलेले हे स्पॉनसरशिप २०२३ पर्यंत चालू राहील.

आम्ही आयपीएलला डीएलएफ आयपीएल, पेप्सी आयपीएल, विवो आयपीएल असे नाव ऐकले आहे, परंतु आम्ही आता याला टाटा आयपीएल म्हणू आपण . टाटा कंपनीबाबत लोकांच्या हृदयात एक वेगळे स्थान आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे रतन टाटा. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल म्हणाले कि , “विवोने टाटाला आपला स्पॉनसरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे.”

View this post on Instagram

A post shared by Ratan Tata (@ratantata)

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि मोठ्या कंपन्या आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी नेहमीच तयार असतात आणि त्यांना या गेममध्ये सामील व्हायचे असते. टाटा कंपनी यापासून पूर्णपणे दूर असली तरी आता टाटा कंपनीने त्यात पाऊल टाकले असून हा आयपीएलसाठी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. टाटाच्या आयपीएलमध्ये सामील झाल्यानंतर आयपीएल जगात अजून पुढे जाईल अशी अपेक्षा आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप