दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मा वनडे टीम मधून बाहेर, हा असेल नवीन कर्णधार..!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंडिया टीमची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेसाठी तंदुरुस्त होईल अशी भारतीय चाहत्यांना आशा होती पण तसे झाले नाही आणि तो वनडे मालिकेतूनही बाहेर पडला आहे. रोहितच्या बाहेर पडण्याचा अर्थ असा आहे की केएल राहुल वनडे संघाची कमान सांभाळेल. अशा परिस्थितीत विराट कोहली पहिल्यांदाच राहुलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीलाही कामाचा ताण पाहता विश्रांती देण्यात आली आहे. या संघात शिखर धवनचेही पुनरागमन झाले आहे.

या संघात देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे. व्यंकटेश अय्यर आणि रुतुराज गायकवाड यांच्या नावाचाही या खेळाडूंमध्ये समावेश आहे. या दोघांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि आता दोघेही एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसू शकता.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ – केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

केएल राहुल पहिल्यांदाच टीम इंडियाचा कर्णधार होणार आहे. त्याने यापूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवले आहे. बुमराहलाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राहुलच्या अनुपस्थितीत बुमराह कर्णधार असेल. ऋतुराज गायकवाडही वनडे संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत ऋतुराज जबरदस्त फॉर्मात होता. या स्पर्धेत त्याने चार शतके झळकावली होती. तो धवन आणि राहुल बॅकअप असतील. या दोघांपैकी एकाला दुखापत झाल्यास ऋतुराज ओपनिंग करताना दिसणार आहे.

याशिवाय शिखर धवनही स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. कोहलीशिवाय मधल्या फळीची जबाबदारी सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यांच्यावर असेल. पंतसाठी कव्हर म्हणून इशान किशनलाही स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर अश्विन व्यतिरिक्त संघाकडे युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटू असतील. संघात सहा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. बुमराह व्यतिरिक्त यात भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध, शार्दुल आणि सिराज यांचा समावेश आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप