पाकिस्तानच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा झाला, फायनलचा रस्ता सोपा झाला..!

पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव केल्यानंतर, पाकिस्तानचे जवळपास 6 टक्के गुण वाढले आहेत आणि संघाचे आता 58.33 टक्के गुण आहेत. पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून तिसरे स्थान पटकावले, परंतु पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर, संघ आता सलग तीन स्थानांनी घसरून सहाव्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंकेचे आता ४८.१५ टक्के गुण आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pakistan Cricket (@therealpcb)

पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर यानंतर वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे आणि या पराभवानंतर श्रीलंकेचा संघ सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंड सातव्या तर न्यूझीलंड आठव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश संघ शेवटच्या आणि नवव्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही दुसरी सायकल रनिंग आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना संपला आहे. पाकिस्तानने हा सामना चार विकेटने जिंकला आहे. या विजयासह पाकिस्तानने केवळ मालिकेतच आघाडी घेतली नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही आपले स्थान मजबूत केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या या विजयाचा फायदा टीम इंडियालाही झाला आहे. या सामन्यापर्यंत टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर होती, मात्र आता भारतीय संघाने चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे.

आपल्याला माहीतच आहे आपला पाकिस्तान हा पारंपारिक शस्त्रू आहे आणि आज पर्येंत आपण प्रत्येक सामन्यात आपण पाकिस्तान ला सपशेल हरवत आलो आहे. तसेच  पाकिस्तान आणि श्रीलंका च्यामध्ये सामना चालू होता आणि तो पाकिस्तान ने जिंकला आणि  कसोटी सामना होता. पाकिस्तान जिंकला आणि त्यामुळे श्रीलंका ICC टेस्ट चॅम्पिअनशिप मध्ये भारतापेक्षा मागे पडला आहे. तसेच भारताच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप