रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी टीम इंडियासाठी ओपनिंगची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळली असून, त्यांनी अनेक मोठ्या इनिंग्स एकत्र खेळल्या आहेत. बऱ्याच काळानंतर टीम इंडियाला रोहित-धवनसारखी जोडी मिळाली, जी जगाच्या कानाकोपऱ्यात धावा करण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र दोन्ही खेळाडूंचे वाढते वय पाहता रिप्लेसमेंट म्हणून दोन युवा खेळाडू हजर झाले आहेत.
अंडर- १९ संघाचे हे दोन खेळाडू पुढील रोहित-धवन बनतील : यश धुल हा भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा उत्कृष्ट कर्णधार असण्यासोबतच एक महान फलंदाज आहे. हा फलंदाज अनेकदा क्लासिक इनिंग खेळण्यासाठी ओळखला जातो. तर त्याच्या कप्तानी मध्ये रोहित शर्मासारखी आक्रमकता पाहायला मिळते. अंडर-१९ विश्वचषकात यश धुल कोरोनामुळे सुरुवातीचे लीग मैच खेळू शकला नाही. मात्र यश धुलने बांगलादेशविरुद्ध शानदार पुनरागमन केले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ११० धावांची शानदार खेळी केली होती. धुलने या आयसीसी स्पर्धेत २१२ धावा केल्या आहेत, त्याही १०६ च्या आश्चर्यकारक सरासरीने. यश धुलचे नावही आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये आहे. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
भारताच्या अंडर- १९ संघाचा सलामीवीर हरनूर सिंग धवनच्या शैलीत फलंदाजी करतो. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हरनूर सिंगची चेंडूं हिट करण्याची कला सर्वांनाच माहीत आहे. या सलामीवीर फलंदाजाने आशिया कपच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. हरनूर सिंगने ४ सामन्यात १३१ धावा केल्या होत्या. यादरम्यान हरनूरची सरासरी ३२.७५ होती आणि त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली होती. त्याचबरोबर अंडर १९ वर्ल्ड कप मध्ये त्याने आतापर्यंत १०४ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत तो आगामी काळात टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसू शकतो.
View this post on Instagram
यश धुल आणि सलामीवीर हरनूर सिंग यांनी एकत्र सलामी दिली तर ही जोडी हुबेहूब रोहित-धवनसारखी दिसेल. दोन्ही खेळाडूंमध्ये विकेटवर टिकून राहण्याची उत्कृष्ट कला आहे. भविष्यात हे दोन्ही तगडे फलंदाज टीम इंडियाकडून खेळताना दिसले तर नवल वाटणार नाही. चमकदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंवर बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्त्यांची नजर नक्कीच असेल. दुसरीकडे, आयपीएल मेगा लिलावातही दोघांची मूळ किंमत २० लाख रुपये आहे. दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केल्यास दोघांवर मोठी बोली लागू शकते.