टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत विंडीजचा केला क्लीन स्वीप, शुभमन गिल विजयाचा ठरला हिरो..!

टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमा नुसार तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ११९ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांचा ३-० असा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला शुभमन गिल, ज्याने ९८ धावांची नाबाद खेळी केली. गिलला प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरविण्यात आले आहे.

पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमा नुसार वेस्ट इंडिजचा ११९ धावांनी पराभव केला. या विजयासह शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. भारतीय संघाने पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा सफाया केला आहे. सलामीवीर शुभमन गिलने (नाबाद ९८) टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

डकवर्थ लुईस नियमा नुसार वेस्ट इंडिजला ३५ षटकांत २५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांचे फलंदाज एका मागून एक बाद होत राहिले होते. परिणामी, संपूर्ण संघ २६ षटकांत १३७ धावांत बाद झाला होता. वेस्ट इंडिज साठी कर्णधार निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग काही काळ विकेट वर राहू शकले. किंग आणि पूरन यांनी ४२-४२ धावांची खेळी केली. याशिवाय केवळ शाई होप (२२) आणि हेडन वॉल्श ज्युनियर यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

वेस्ट इंडिजच्या डावाची अशी स्थिती होती की त्यांचे चार खेळाडू शून्यावर बाद झाले. भारता कडून लेगस्पिनर युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना दोन, दोन यश मिळाले. प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनाही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले. शुभमन गिलला सामनावीर आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.

श्रेयसनंतर क्रीज वर आलेला सूर्यकुमार यादव फार काही करू शकला नाही आणि तो हेडन वॉल्श ज्युनियरचा दुसरा बळी ठरला. ३६ षटकं पूर्ण झाल्या नंतर भारताची धावसंख्या ३ बाद २२५ अशी होती, तेव्हा पुन्हा पाऊस आला आणि भारतीय डाव तिथेच संपवावा लागला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप