आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, पंत नाही तर या कारणामुळे झाली पांड्याची कर्णधार पदी वर्णी..!

टीम इंडिया २६ जूनपासून आयर्लंडसोबत २ सामन्यांची T-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी टीम इंडियाचा संघ जाहीर केला. या संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. एवढेच नाही तर या संघात यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचे पुनरागमनही पाहायला मिळाले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी संध्याकाळी आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या २ सामन्यांच्या T-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे, ज्याने गुजरात टायटन्सला आयपीएल २०२२ मध्ये विजेतेपद मिळवून दिले. भुवनेश्वर कुमारची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वास्तविक, २६ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेदरम्यान भारताची कोअर टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर असेल. त्यामुळे या संघात रोहित शर्मा, विराट कोहली अशा सर्वच खेळाडूंची नावे नाहीत. एवढेच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपद भूषवणारा ऋषभ पंतही त्यावेळी टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर असेल. त्यामुळे त्याचे नावही या संघात नाही.

टीम इंडियाची घोषणा होताच संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठीच्या चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या असतील. आयपीएल २०२२ मध्ये, राहुल त्रिपाठीने बॅटने उत्कृष्ट खेळ दाखवला, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण आता त्रिपाठीला आयर्लंडविरुद्ध पहिला कॉल-अप मिळाला आहे.त्याचबरोबर विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनही टीम इंडियात पुनरागमन करताना दिसत आहे. सॅमसन संघात अनुभव आणतो आणि ज्या दिवशी त्याची बॅट उडेल, त्याच्याकडे एकट्याने विरोधी संघाला चीतपट करण्याची ताकद आहे. या 17 सदस्यीय संघात युवा खेळाडूंना भरपूर संधी मिळाल्या आहेत, आता त्याचा फायदा कोण घेतो, हे पाहण्याचं ठरणार आहे.

अशी असेल टीम: हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप